police recruitment  esakal
जळगाव

Maharashtra Police Recruitment: पोलिस भरतीला बुधवारी प्रारंभ! 4 दिवसांची ‘ग्रेस’; अडचणीत सापडलेल्या उमेदवारांना दिलासा

Jalgaon News : एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्जित असलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणीची तारीख एकाच दिवशी आल्यास त्या उमेदवारांना दोन चाचण्यांमध्ये किमान चार दिवसांचा ग्रेस पिरीयड मिळणार आहे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्य पोलिस दलातील रिक्त पदांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्‍ह्यात बुधवारी (ता. १९) भरती प्रक्रिया सुरू होत आहे. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्जित असलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणीची तारीख एकाच दिवशी आल्यास त्या उमेदवारांना दोन चाचण्यांमध्ये किमान चार दिवसांचा ग्रेस पिरीयड मिळणार आहे, अशी माहिती जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत दिली. (Jalgaon Maharashtra Police recruitment starts on Wednesday)

पोलिस शिपाई, चालक, बॅण्डमन, सशस्त्र पोलिस, तुरूंग पोलिस, अशा विविध पदांसाठी राज्यभर लाखो तरुणांनी अर्ज केले असून, त्या-त्या जिल्‍ह्यातील रिक्त पदानुसार शारिरीक चाचण्या, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि इतर पदांसाठी वेगवेगळ्या चाचण्या उमेदवारांच्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्यांपैकी एकमेव मैदानी चाचणी प्रत्येक उमेदवाराला द्यावीच लागते.

पहिल्या दिवशी उंची, छाती मोजल्यावर चेस्ट नंबर दिल्यावर लगेच मैदानी चाचण्या घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी विविध जिल्‍ह्यात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केले आहेत. अशा उमेदवारांना मैदानी चाचण्यांमध्ये अडचण येण्याची शक्यता होती. परिणामी, दोन मैदानी चाचण्यांमध्ये किमान चार दिवसांचा अवकाश उमेदवारांना मिळणार आहे. जेणेकरुन दोन्ही ठिकाणी उमेदवार भरतीसाठी प्रयत्न करू शकणार आहेत. (latest marathi news)

भरतीची जय्यत तयारी

जिल्‍हा पोलिस दलातील १३७ रिक्त शिपाई पदांसाठी बुधवारी पहाटे साडेचारपासून इच्छूक उमेदवारांना मुख्य प्रवेशद्वारातून आत घेऊन वाहतूक शाखा मैदानाच्या शामियान्यात थांबविण्यात येईल. हॉल टिकीटची तपासणी करून नंतर त्यांना उंची व छाती मोजणीसाठी पन्नास पन्नासच्या गटाने सोडण्यात येणार आहे.

पावसाचे दिवस असल्याने पोलिस दलाचा पावसात मैदानी चाचण्यांसाठी प्लॅन-बी तयार असून, मैदनात चिखल झाल्यास पोलिस वसाहतीच्या रस्त्यावरून धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे. तशी आखणी अगोदरच पोलिस दलाने केली आहे.

व्हिजिलन्स पथक तैनात

पोलिस भरतीसाठी साडेतीनशे कर्मचारी तैनात केले असून, गैरप्रकार, उमेदवारांची लुबाडणूक होऊ नये, यासाठी पोलिस दलातर्फे व्हिजीलन्स टीम कार्यरत राहणार आहे. भरती प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगराणीत, पारदर्शक पद्धतीने राबविली जाणार असून, उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT