bhusawal railway station esakal
जळगाव

Jalgaon: बहुतांश प्रवाशांनी निवडला स्मार्ट तिकिटांचा पर्याय! भुसावळ विभागात स्थिती; 5 महिन्यांत 2 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

Jalgaon News : गेल्या पाच महिन्यांत भुसावळ येथील रेल्वे वाणिज्य विभागाला ऑनलाईन तिकिटांमधून दोन कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : भुसावळ वाणिज्य विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्मार्ट तिकिटांबाबत जनजागृती मोहीम नुकतीच राबविली. या जनजागृतीपर मोहिमेला प्रवाशांकडूनदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून विभागातील बहुतांश प्रवाशांनी स्मार्ट तिकिटांचा पर्याय निवडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत भुसावळ येथील रेल्वे वाणिज्य विभागाला ऑनलाईन तिकिटांमधून दोन कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. (Jalgaon Majority of Passengers Opt for Smart Tickets)

प्रवाशांचा वेळ वाचावा व रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून प्रवाशांना दिलासा मिळावा, यासाठी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील विविध स्थानकांवर अनारक्षित तिकीटाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

युटीएस ॲप वापरण्यासाठी या मोहिमेचा परिणाम म्हणून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत एकूण आठ लाख ५९ हजार प्रवासी तिकिटे यशस्वीरित्या जारी केली. त्यातून एकूण दोन कोटी रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झालेला आहे. त्यावरून बहुतांश प्रवाशांनी स्मार्ट तिकिटाचा पर्याय निवडल्याचे दिसून आले.

भुसावळ विभागातील सर्वच रेल्वेस्थानकांवर ऑनलाइन अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी यूटीएस ऑन मोबाईल ॲप सुविधा उपलब्ध आहे. यूटीएस ऑन मोबाइल ॲप लाँच करण्याचा उद्देश डिजिटल तिकीट मोडला प्रोत्साहन देणे, सेल्फ-तिकीटिंगला प्रोत्साहन देणे व प्रवाशांना रांगेचा त्रास न होता तिकीट खरेदी करता यावे, हा आहे. (latest marathi news)

यूटीएस मोबाइल ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे पेपरलेस प्रवास तिकिटे, सीझन तिकीट व प्लॅटफॉर्म तिकीट थेट मोबाईल यूटीएस ॲपद्वारे बुक करू शकतात. बुक केलेली तिकिटे ॲपमध्ये पाहिली जाऊ जातात, म्हणून हार्डकॉपीची आवश्यकता नाही.

अप व डाउन प्रवासी आता यूटीएस ॲप तिकिटांद्वारे सीझन तिकीट बुक करीत आहेत. सीझन तिकीट प्रवासीधारक युटीएस मोबाईल ॲपद्वारे मासिक (एमएसटी), अर्ध-वार्षिक (एसएसटी) आणि वार्षिक (वायएसटी) सीजन तिकीट खरेदी करू शकतात.

ॲपवर ‘यूटीएस’च्या वापरास प्रोत्साहन द्या

यूटीएस ॲपमध्ये समाविष्ट केलेली नवीन वैशिष्ट्ये प्रवाशांना या डिजिटल ॲपकडे आकर्षित करीत आहेत. कारण प्रवशांचा वेळ वाचण्याबरोबरच रांगेत उभे राहण्याचा त्रासही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. म्हणून अनारक्षित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोबाईल तिकीट ॲपवर यूटीएसच्या वापरास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन भुुसावळ येथील रेल्वे विभागातील वरिष्ठ विभागीय वाणिज्य शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT