Jalgaon News : वर्गखोल्यांचे गळके छत, तडा गेलेल्या भिंती, तुटलेल्या खिडक्या, तुटलेले प्रवेशद्वार, विद्यार्थ्यांना बसण्यालायक नाहीत, अशी धोकादायक अवस्था तालुक्यात काही गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्यांची झाली आहे. म्हणून अशा धोकादायक खोल्यांत मुलांना न बसविता सुरक्षितस्थळी बसवून विद्यार्थी बाराखडी गिरविणार आहेत. तालुक्यांत नऊ ठिकाणी पडक्या खोल्याच्या निर्लेखनाचे प्रस्ताव स्थानिक पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. ( school rooms are dangerous in Chopda taluka )
आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत काही शाळा डिजिटल झाल्यात. मात्र, प्राथमिक सुविधांची वानवा दिसून येते. आज पंधरा जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. यंदाही अशाच धोकादायक शाळांमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार आहे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १३८ शाळा आहेत.
त्यात शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १३८ शाळांपैकी आडगाव, नरवाडे, तावसे, वटार, खाचने, भवाळे, धूप खुर्द, माचले, वरगव्हाण अशा एकूण नऊ गावांत शाळांच्या खोल्या धोकेदायक आहे. या खोल्या निर्लेखनाचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. (latest marathi news)
शिक्षकांची २२ पदे रिक्त
चोपडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १३८ शाळांमधील एकूण २२ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अध्यापनात अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्हा बदलीमध्ये पाच शिक्षक तालुक्यात बदली होऊन आलेले आहेत. त्यामुळे काहीअंशी रिक्त जागा कमी झालेल्या आहेत.
''तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गात बसविले जाईल. त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही, याची संपूर्ण'काळजी घेतली जाणार आहे. वर्गखोल्या निर्लेखनाबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे.''- अविनाश पाटील, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चोपडा.
३६ हजार विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप
नवीन शैक्षणिक वर्षाच्या शनिवारी पहिल्याच दिवशी एकूण २४६ शाळांपैकी मराठी माध्यम अनुदानित २०३ शाळा व उर्दू माध्यम अनुदानित १८ अशा २२१ शाळांतील ३६ हजार १०० विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे शाळेकडून ढोलताशांच्या गजरात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्याना मिष्ठान्न भोजनही देण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस खुपच आनंदात गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.