जळगाव : कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus) रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित (Jalgaon corona positive patient) रुग्णांची संख्या ११ हजार ८१३ वरुन ५ हजार ९१५ पर्यत म्हणजेच निम्म्याने घटली आहे. काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढते आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब असली नागरीकांनी गाफील न राहता यापुढेही कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. (coronavirus-update-jalgaon-district-active-patient-ratio-down)
जिल्ह्यात पहिल्या लाटेत सक्रीय (Corona active patient) रुग्णांची संख्या १२ हजारांच्या आसपास गेली होती. मात्र राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने लावलेले कडक निर्बध, जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना, माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान व संशयित रुग्ण शोध माहिमेसह सर्व लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले होते.
१ एप्रिलला आकडा उच्चांकी पातळीवर
कोरोनाची दुसऱ्या लाटेत दररोज हजारो बाधित रुग्ण आढळून येत होते. १ एप्रिल रोजी जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या ११ हजार ८१३ या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. मात्र शासनाच्या ‘ब्रेक द चेन अतंर्गत’ कोरोनाचे निर्बध अधिक कडक करण्यात आले. शिवाय बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील, संशयित रुग्णांचा (Jalgaon corona update) शोध घेऊन कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्णांवर उपचार झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढले. मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आले. सध्या जिल्ह्यात ५ हजार ९१५ इतके सक्रीय रुग्ण आहेत.
११ लाख स्वॅबची तपासणी
जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख ५० हजार ७८३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यापैकी १ लाख ३९ हजार ८२७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर १० लाख ७ हजार ९२५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या ४ हजार ७२२ रुग्ण होम क्वारंटाईन असून २१२ रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ५ हजार ९१५ सक्रीय रुग्णांपैकी ४ हजार ९०६ रुग्ण लक्षणे नसलेले तर १ हजार ९ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.