Officials of the Mandal carrying the idol of Devi. esakal
जळगाव

Jalgaon : नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी सजली बाजारपेठ! दुर्गादेवी मंडळांकडून मूर्तींचे आरक्षण; शहरात गरबा-दांडियाचे प्रशिक्षण

Latest Navratri 2024 News : अनेक ठिकाणी दांडिया, गरबा रासही खेळली जाते. त्यासाठीची दांडियाचे प्रशिक्षण युवक, युवतींना काही संस्था देत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नवरात्र अर्थात देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा हिंदू सण.. नवरात्रोत्सव हा विविध देवीची पूजा, उपवास, तप करण्याचा व पुण्य कमाण्याचा सण आहे. नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज होत आहे. अनेक ठिकाणी दांडिया, गरबा रासही खेळली जाते. त्यासाठीची दांडियाचे प्रशिक्षण युवक, युवतींना काही संस्था देत आहेत. (Market decorated to welcome Navratri 2024)

नवरात्रोत्सवात अनेक भाविक नऊ दिवस कडक उपवास करतात, अनवाणी फिरतात. केवळ एक वेळ उपवासाचे पदार्थ खातात. देवीच पूजा-अर्चा, सप्तशतीचे पाठ करून शक्ती प्राप्त करतात. देवीची सार्वत्रिक मूर्ती बसवून देवीसमोर दांडिया, गरबा खेळण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू झाली आहे. विविध देवी मंडळांनी मूर्तीचे आरक्षण करून ठेवले आहे. काहींनी ऐनवेळी गर्दी नको म्हणून देवीची मूर्ती मंडळाकडे वाहनांवर नेणे सुरू केले आहे.

सर्वपित्री अमावस्या बुधवारी (ता.२) झाली की, येत्या गुरूवारी (ता.३) घटस्थापना होणार आहे. त्यासाठी बाजारात पूजेसाठीचे साहित्य, विविध प्रकारच्या देवीच्या मूर्ती, आराससाठीचे सामान, नारळ ओटी भरण्याचे सााहित्य, हळद, कुकूं आदी साहित्य बाजारात विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीस आणले आहेत.

नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होतो. पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदा नवरात्री नावाचा हा सण आहे. हा सण हिंदू कॅलेंडर महिन्याच्या अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जातो. हा शारदीय नवरात्रोत्सव आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. या नऊ दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा व अर्चना केली जाते. (latest marathi news)

देवीची नऊ रूपे

सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी, असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात.

उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून, दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. तर शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे, असे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT