Gold Silver Rate esakal
जळगाव

Jalgaon Gold Silver Market : सोन्याच्या भावात चढ-उतार सुरूच! ‘चांदी’त दिवसभरात प्रतिकिलो चौदाशेची ‘उसळी’

Jalgaon News : सोन्याचे भाव गेले दोन दिवस स्थिर राहिल्यावर सोमवारी (ता. २७) प्रति दहा ग्रॅमला ४०० रुपयांची वाढ झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Gold Silver Market : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहेत. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेतही दिसून येत आहे. सोन्याचे भाव गेले दोन दिवस स्थिर राहिल्यावर सोमवारी (ता. २७) प्रति दहा ग्रॅमला ४०० रुपयांची वाढ झाली. सोन्याचे आजचे (ता. २७) भाव ७२ हजार ६०० रुपये होते.

दुसरीकडे चांदीने किलोमागे दिवसभरात तब्बल १४०० रुपयांची ‘उसळी’ घेतली. त्यामुळे चांदीत झालेली वाढ सर्वांसाठी चक्रावून टाकणारी आहे. आगामी काळात सोने आणि चांदीतील ही भाववाढ अशीच सुरू राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. (Jalgaon Market Gold prices continue to fluctuate)

जळगावच्या सुवर्ण बाजारात महिनाभरात सोने व चांदीच्या भावात वेगाने चढ-उतार होताना दिसत आहे. तीन दिवसांपासून स्थिर असलेला सुवर्णबाजार पुन्हा वधारत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांचा आढावा घेतला असता गुढीपाडव्याला सोन्याचा भाव जीएसटीसह ७४ हजार ३६६ रुपयांवर होता.

चांदीच्या भावातही तीन हजारांची वाढ होऊन चांदी ८५ हजार ३८७ रुपयांवर आली होती. सोन्यातील भाववाढीचा परिणाम गुढीपाडव्याला ग्राहकांच्या खरेदीवर दिसून आला. गुढीपाडव्याचा मुहूर्त असतानाही सोने खरेदीत निम्मी घट झाली होती. यामुळे सुवर्ण बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला होता.

आता आगामी दोन महिने लग्नसराई नाही. यामुळे सोन्याची मागणी घटली आहे. आता गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव गेल्या आठवड्याच्या सुरवातीला २० मेस प्रति दहा ग्रॅमला (विना जीएसटी) ७४,९०० रुपये होता. नंतर मंगळवारी (ता. २१) ७४,५०० रुपये होता. त्यानंतर बुधवारी (ता. २३) सोन्यात तब्बल हजारांची घसरण होऊन भाव ७४ हजार ५०० वरून ७३ हजार ३०० वर आले.

गेल्या दोन, तीन दिवस सोन्याचे भाव स्थिर राहून आज पुन्हा चारशे रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्याचा भाव सोमवारी (ता. २७) प्रति दहा ग्रॅमला ७२ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचला. सोन्याच्या भावात दिवसागणिक होणारे बदल हे गुंतवणूकदारांसह जाणकारांनाही चक्रावून टाकणारे आहेत. (latest marathi news)

सोने-चांदीच्या भावातील चढ-उतार (विना जीएसटी)

तारीख............सोने (प्रति दहा ग्रॅम)....चांदी (प्रति किलो)

- २० मे..........७४ हजार ९००........९१ हजार

- २१ मे..........७४ हजार ५००........९२ हजार

- २२ मे..........७४ हजार ४००........९२ हजार

- २३ मे..........७३ हजार ३००........९० हजार

- २४ मे..........७२ हजार ४००........९० हजार

- २५ मे..........७२ हजार २००........९० हजार

- २६ मे..........७२ हजार २००........९० हजार

- २७ मे..........७२ हजार ६००........९१ हजार ४००

(latest marathi news)

चांदीकडे गुंतवणूकदारांनी वेधले लक्ष

आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेले चढ-उतार, महागाईचा वाढता दबाव, औद्योगिक क्षेत्रात वाढलेली मागणी, अशा सर्वच कारणांमुळे चांदीच्या भावात वाढ झाल्याचे जाणकार सांगगतात. नवीन वर्षांत औद्योगिक क्षेत्रात चांदीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी, चांदीच्या भावात हळूहळू वाढ होऊ लागली.

मेमधील दरवाढीची स्थिती पाहिल्यास एक मेस चांदीचा भाव जीएसटी विना ८१ हजार ९०० रुपये किलो होता. चार मेपर्यंत ८० हजार ६०० रुपयांपर्यंत कमी झाला. सहा मेस ८२ हजार ३०० रुपयांवर गेला. आठ मेपर्यंत भाव ८२ हजार ५०० रुपयांवर स्थिर होता. नऊ मेस ८०० रुपयांनी वाढून ८३ हजार ३०० रुपयांवर पोहोचले.

दहा मेस अचानक दोन हजारांची वाढ होऊन ८५ हजार ३०० रुपयांवर भाव पोहोचला. ११ ते १४ मेदरम्यान चांदीचा भाव ८५ हजारांखाली अर्थात ८४ हजार ९०० पर्यंत खाली आला. परंतु १६ मेस चांदीत तब्बल दीड हजाराची किलोमागे वाढ झाली होती. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून ९० हजारांवर स्थिर असलेली चांदी सोमवारी मात्र चौदाशे रुपयांनी वधारली. त्यामुळे चांदीच्या भावातील या घडामोडींकडे गुंतवणूकदारांनीही लक्ष वेधले आहे.

"आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर सोने व चांदीचे भाव अवलंबून असतात. गेल्या पंधरवड्यात भावात सातत्याने कमी, जास्त बदल झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारही याकडे आकर्षित झाले असून, पुढील काही दिवस भाव स्थिर राहण्याची चिन्हे कमीच आहेत."

- मिलिंद विसपुते, सराफ व्यावसायिक, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT