A large number of red pitchers have come in the market, and customers while buying pitchers.A large number of red pitchers have come in the market, and customers while buying pitchers.  esakal
जळगाव

Akshaya Tritiya 2024 : आखाजीच्या सणासाठी जळगावची बाजारपेठ फुलली; सुवर्ण बाजारात उत्साह

Akshaya Tritiya 2024 :साडेतीन मुहूर्तांपैकी असलेल्या अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला जळगाव शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी असलेल्या अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला जळगाव शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. सोन्याच्या बाजारातही उत्साह आहे. बाजारपेठेत आंब्याची मागणी व आवकही वाढली आहे. तर घागरींनीही बाजारपेठ सज्ज आहे. अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला मुहूर्त. खानदेशात या सणाला ‘आखाजी’ असे म्हटले जाते. खानदेशात आखाजीचा सण साजरी करण्याची वेगळी परंपरा आहे. (jalgaon market rush for festival Akshaya Tritiya shopping )

आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी घागरी भरण्याची प्रथा आहे. त्यानिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणात मातीच्या घागरी दाखल झाल्या आहेत. घागरीवर आंबा, डांगर ठेवून पूजन केले जाते.

सोन्याच्या बाजारात तेजी

काही महिन्यांपासून सोन्याचे भाव झपाट्याने वाढले. गेल्या आठवड्यापर्यंत ते ७३ हजार रुपयांपर्यंत (प्रति १० ग्रॅम) गेले. लग्नसराईला दीड महिन्याचा ब्रेक मिळाल्याने सोन्याच्या भावात काहीशी घसरण झाली. मात्र, पुन्हा या आठवड्यात भाव वाढू लागले असून, ते अक्षयतृतीयानिमित्त वाढल्याचे मानले जातेय. (latest marathi news)

दुचाकी, चारचाकींची नोंदणी

अक्षयतृतीयाच्या पाश्‍र्वभूमीवर दुचाकी व चारचाकींची नोंदणी (बुकिंग) होत आहे. या मुहूर्तावर वाहने खरेदीवर ग्राहकांचा भर असतो. त्यामुळे बाजारात आखाजीच्या उत्सवावर सुमारे हजारावर दुचाकी व दोनशेवर चारचाकी वाहने विकली जातील, असे सांगितले जात आहे. शिवाय, फ्लॅट, घरांची खरेदीही याच मुहूर्तावर करण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे गृहस्वप्न साकारण्यासाठीही ग्राहक सज्ज झाले आहेत.

हे आहे खरेदीचे कारण

अक्षयतृतीय सण वैशाखातील रणरणत्या उन्हात नवे चैतन्य घेऊन येतो. या दिवशी खरेदी केलेली वस्तू अक्षय्य राहते, अशी नागरिकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच या मुहूर्ताला साडेतीन मुहूर्तांमध्ये स्थान असून, या दिवशी ग्राहकांचा विविध वस्तू, प्लॉट, घर घेण्यावर भर असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT