Jalgaon Unseasonal Rain Damage : ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीचा प्रत्यय सध्या शेतकऱ्यांना येत आहे. अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी कसेबसे पीक घेतलेले असताना अवकाळी पाऊस त्यांची पाठ सोडायला तयार नाही.
दोन दिवसांपूर्वी वादळीवाऱ्याने प्रचंड नुकसान झालेले असताना शुक्रवारी (ता. १) पुन्हा मेहुणबारे भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार दणका दिला. (Jalgaon Mehunbare area has suffered heavy damage due to unseasonal rain)
मेहुणबारे परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाट पावसाने दमदार हजेरी लावली. दोन दिवस दुपारपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. कांदा, गहू, हरभरा, आंबा आणि भाजीपाल्याचेही अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या अपत्तीने आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी आता रोजच्या नव्या आपत्तीने पुरता खचला आहे.
त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत हिरावला जात आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास मेहुणबारे भागात अवकळी पावसाला सुरुवात झाली. तिरपोळे भागात वीस मिनिटे पावसाने हजेरी लावली. सुरवातीला पावसाने जोर धरला. नंतर मात्र रिमझिम पाऊस सुरू होता. शिदवाडी भागातही पंधरा मिनिटे पाऊस झाला. (latest marathi news)
ज्यामुळे काढणीवर आलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी दहा ते बारा दिवसात गव्हाची कापणी होणार होती. तर काही ठिकाणी गव्हाच्या काढणीला सुरवातही झाली होती. मात्र, आजच्या पावसामुळे गहू अक्षरशः मातीमोल झाला आहे. आजच्या पावसामुळे गहू कापणी करणाऱ्या तसेच कांदा काढणाऱ्या शेतकऱ्यांची शेतात एकच तारांबळ उडाली होती.
६३ गावांना नुकसानीचा फटका
चाळीसगाव तालुक्यातील तब्बल ६३ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ज्यामुळे सुमारे ८ हजार २१२ शेतकऱ्यांचे ५ हजार ५६५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. अर्थात ही शासकीय आकडेवारी असून प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पंचनामे बाकी असल्याने यापेक्षाही मोठे क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.