MLA Chimanrao Patil and MLA Mangesh Chavan during discussion on the last day of District Milk Union election withdrawal on Monday & NCP's Dr. Satish Patil and officials esaka
जळगाव

Jalgaon Milk Union Election : 2 मंत्री, आमदार, माजी आमदारांची काट्याची लढत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे विरुद्ध महाविकास आघाडी पॅनल, तर विद्यमान मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात भाजप-शिंदे गट पॅनल अशी लढत होत आहे. यात आता दोन मंत्री, आमदार व माजी आमदार यांची काट्याची लढत आहे. राष्ट्रवादीचे पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ बिनविरोध झाले आहेत. मात्र ते भाजप शिंदे गटात सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनीही भाजप-शिंदे गटातून आपली उमेदवार जाहीर केली आहे. (Jalgaon Milk Union Election 2 Ministers MLAs Ex MLAs in bitter fight jalgaon news)

दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्हा दूध संघात असलेल्या निवडणूक कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दुपारी एकपर्यंत फारशी गर्दी नव्हती. त्यांनतर मात्र माघार घेणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. दुपारी तीननंतर प्रवेशद्वार बंद करून घ्यावे लागले.

‘राष्ट्रवादी’चे वाघ शिंदे-भाजप गटात बिनविरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचोरा येथील माजी आमदार दिलीप वाघ हे एकमेव पाचोरा मतदार संघातून बिनविरोध झाले आहेत. ते अगोदर महाविकास आघाडी पॅनलमध्ये होते, मात्र बिनविरोध होताच त्यांनी शिंदे -भाजप गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता शिंदे भाजप गटाने वाघ यांच्या बिनविरोधच्या माध्यमातून संचालकपद विजयाचा श्रीगणेशा केला आहे. वाघ यांच्या विरोधात शिंदे-भाजप गटाचे आमदार किशोर पाटील यांनी माघार घेतली आहे.

गिरीश महाजन, गुलाबराव मैदानात

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या मैदानात राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रथमच मैदानात उतरले आहेत. त्यांची सरळ थेट एकास एक लढत होत आहे. जामनेर तालुक्यातून मंत्री महाजन यांच्या विरोधात नेरी येथील माजी सरपंच दिनेश पाटील लढत देत आहेत, तर जळगाव तालुक्यातून मंत्री पाटील यांच्या विरोधात जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासूबाई तसेच शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या मातोश्री मालतीबाई महाजन लढत देत आहेत.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

अशा लढती- असे उमेदवार

जळगाव तालुका- मंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध मालतीबाई महाजन, मुक्ताईनगर -मंदाकिनी खडसे विरुद्ध आमदार मंगेश चव्हाण, जामनेर-मंत्री गिरीश महाजन विरुद्ध दिनेश पाटील, अमळनेर-आमदार अनिल भाईदास पाटील विरुद्ध माजी आमदार स्मिता वाघ, एरंडोल-भागचंद (अमर) जैन विरुद्ध दगडू धोंडू चौधरी, चाळीसगाव-प्रमोद पांडूरंग पाटील विरुद्ध सुभाष नानाभाऊ पाटील, चोपडा-इंदिराताई भानुदास पाटील विरुद्ध रोहित दिलीप निकम, धरणगाव-संजय मुरलीधर पवार विरुद्ध वाल्मीक विक्रम पाटील, पारोळा-आमदार चिमणराव पाटील विरुद्ध माजी आमदार डॉ.सतीश पाटील, बोदवड तालुका-ॲड. रवींद्र पाटील विरुद्ध मधुकर रामचंद्र राणे, भडगाव-रावसाहेब भोसले विरुद्ध डॉ. संजीव कृष्णराव पाटील, यावल- हेमराज खुशाल चौधरी विरुद्ध नितीन नारायण चौधरी, रावेर- जगदीश लहू बढे विरुद्ध ठकसेन भास्कर पाटील, अनु-जाती-जमाती- संजय वामन सावकारे विरुद्ध श्रावण सदा ब्रह्मे, इतर मागासवर्ग- गोपाळ रामकृष्ण भंगाळे विरुद्ध पराग वसंतराव मोरे, महिला राखीव (दोन संचालक)- पूनम प्रशांत पाटील, सुनिता राजेंद्र पाटील विरुद्ध उषाबाई विश्‍वासराव पाटील, मनीषा अनंतराव सूर्यवंशी, सुनीता राजेंद्र पाटील, छाया गुलाबराव देवकर, विजाभज विमाप्र- विजय रामदास पाटील विरुद्ध अरविंद भगवान देशमुख.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT