alarm chain esakal
जळगाव

Jalgaon News : ‘अलार्म चेन’चा गैरवापर हा गंभीर गुन्हा; नियम मोडणाऱ्यांना होऊ शकतो एक वर्षापर्यंत कारावास अन् दंड

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘मध्य रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (एसीपी) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ट्रेनच्या लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर (गार्ड) यांना सतर्क करण्यासाठी अलार्म चेन आणिबाणीच्या परिस्थितीत खेचण्यासाठी तयार केलेली आहे. परंतु प्रवासी क्षुल्लक कारणांसाठी एसीपीचा गैरवापर करत असून, अलार्म चेनचा गैरवापर हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. यामुळे एक वर्षापर्यंत कारावास, एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेचा समावेश असू शकतो. ( Misuse of alarm chain is serious crime )

मध्य रेल्वे एसीपीच्या अशा घटनांवर लक्ष ठेवून आहे. एप्रिल-२०२३ ते जून-२०२४ या कालावधीत मध्य रेल्वेने अलार्म चेनच्या गैरवापराची ११,४३४ प्रकरणे नोंदवली. रेल्वे कायद्याच्या १४१ नुसार ९६५७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून ६३ लाख २१ हजारांचा दंड वसूल केला. अलार्म चेन खेचण्याच्या वैध कारणांमध्ये आगीच्या घटना, आरोग्य आणिबाणी, गुन्हेगारी प्रकरणे किंवा ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना अपघात यासारख्या आणिबाणीचा समावेश होतो.

प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि कल्याणाची खात्री करण्यासाठी या परिस्थितींकडे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ट्रेनमधील एसीपीच्या कृतींचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनवर परिणाम होत नाही तर त्यामागून येणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो ज्यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते. पुढे एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी एसीपीचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.

योग्य वापर करण्याचे आवाहन

मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना अलार्म चेन जबाबदारीने वापरण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक आपत्कालीन परिस्थिती वगळता ती ओढण्यापासून परावृत्त करीत आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, प्रवासी सुरक्षितता, वक्तशीरपणा आणि रेल्वे सेवा सुरळीत चालविण्यात योगदान देतात.

भुसावळ विभागातील चित्र

प्रकरणे : २,९३१

अटक : २,८२४

दंड वसूल : २१ लाख ७६ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'त्यांची नियत नीट नव्हती, म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला'; राहुल गांधींचा भाजपला सणसणीत टोला

Mahindra Thar Roxx : ‘थार रॉक्स’ला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद; एका तासात विक्रमी १ लाख ७६ हजार गाड्यांची नोंदणी

कमला हॅरिस, तुलसी गॅबार्ड अन् उषा व्हान्स.. अमेरिकन राजकारणात भारतीयांचे वाढले महत्व

खेळाडूंनी MS Dhoni कडून बरंच काही शिकायला हवं; पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक अन् गौतम गंभीरबद्दल म्हणाला...

Gondia Crime : खून करून मृतदेह खड्ड्यात पुरला...चार दिवसांनंतर झाला उलगडा; उधारीच्या पैशावरून मालकानेच घेतला जीव

SCROLL FOR NEXT