जळगाव : मुक्ताईनगर मतदार संघात ४३ हजार २४७ मतदारांची नावे दुबार, तिबार आहेत. ती नावे बोगस आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अद्यापपर्यंत ती नावे वगळण्यात आलेली नाहीत. एवढ्या मतदारांची दुबार असल्यावरही निवडणूक विभाग याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. मतदारांची दुबार तिबार नावे असण्यामध्ये व ती न वगळण्यात अदृष्य शक्तीचा हात असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांचे नाव न घेता आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत केला. (43 thousand bogus voters in Muktainagar constituency )
जिल्ह्यात प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याची ३० ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली होती. त्यानंतर प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात ४३ हजार २४६ हजार मतदारांची दोन वेळा किंवा चार वेळेस नावे असलेली आढळून आली. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र यादीमध्ये बदल केलेला नाही. यासंदर्भात हरकत घेतली असता तसेच मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. निवडणूक मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही कोणत्याही स्वरूपात या संदर्भात बदल केलेले नाही. (latest maratahi news)
मी आज पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र दिले आहे. भुसावळ, मलकापूर, मुक्ताईनगर अशा मतदारसंघांतही चार ते पाच वेळा नावे असलेले मतदार आहेत. त्याची पुर्नतपासणी करून दुबार नावे असलेली यादी वगळण्यात यावी, मी असा मुद्दा उपस्थित केलेला होता. जर अशी एक किंवा अनेक ठिकाणी नाव असतील तर अशी नावे वगळून वगळावी; अन्यथा मी उच्च न्यायालयात जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात असा घोळ आहे.
''मुक्ताईनगर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड आजारी रजेवर आहेत. ते सोमवारी कार्यालयात येतील. आमदार पाटील यांनी लेखी उत्तर मागितल्याने श्री. गायकवाड लेखी उत्तर देऊ शकतील. एकाच मतदाराचे दुबार मतदार होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.''- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.