Monsoon Dealey esakal
जळगाव

Jalgaon Monsoon Dealey : जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट; जून पावसाविनाच, जिल्ह्यात 70 टक्के पेरण्या खोळंबल्या

Monsoon Dealey : जून महिन्यात जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात साठ ते ऐंशी मिलिमीटर पाऊस झाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Monsoon Dealey : जून महिन्यात जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात साठ ते ऐंशी मिलिमीटर पाऊस झाला. नंतर मात्र पावसाने मोठा ब्रेक घेतला आहे. बागायतदारांनी कपाशीच्या पेरण्या केल्या. सोबतच काही कोरडवाहू शेतकऱ्यांनीही पेरण्या केल्या. आतापर्यंत ३० ते ३४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सत्तर टक्के पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहे. जून महिन्यात चांगला पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज फोल ठरताना दिसत आहे. (Double Sowing Crisis in District 70 Percent Showing Failed in District )

गतवर्षी ९३ टक्के पाऊस झाला तरी तो वेळेवर पडला नव्हता. यामुळे उत्पादनात मोठी घट आली होती. खरीप हंगामाच्या शेवटी अतिवृष्टीने कापसाचे उत्पादनही घटले. यंदा तरी चांगला पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. हवामान विभागाने चांगला पाऊस सांगितला होता. मात्र जूनचे २२ दिवस उलटले तरी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही.

यामुळे ७० टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पाऊस पडतो तर काही ठिकाणी एकदम कोरडा असतो. यामुळे शेतकऱ्यांपुढे पेरण्या कराव्या किंवा नाही याची चिंता आहे. बागायतदार शेतकऱ्यांकडे पाणी असल्याने त्यांना चिंता नाही. मात्र कोरडवाहू शेतकरी ज्यांनी पेरण्या केल्या नंतर पाऊस पडतच नाही. अशांनी पेरण्या करणे थांबविले आहे.

मात्र त्यांना आता दोन चार दिवसात पाऊस न झाल्यास रोपे मान टाकण्याची भीती आहे. भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, जळगाव या तालुक्यात सरासरी १०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र ठिकाणी त्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे. पाऊस पडण्याची शेतकरी चातकासारखी वाट पहात आहे. (latest marathi news)

तालुकानिहाय पाऊस (मिली मीटरमध्ये)

तालुका-मिलिमीटर

जळगाव- ११२.२

भुसावळ- ७६.९

यावल-- ६४.८

रावेर- ६२.४

मुक्ताईनगर--८४.२

अमळनेर--१२४.१

चोपडा--३८.३

एरंडोल-- १०५.९

पारोळा-- ५५.६

चाळीसगाव--१२३.२

जामनेर--१३४.८

पाचोरा--१४४.१

भडगाव-१३८.९

धरणगाव--६१.३

बोदवद-- ५०.९

जिल्हा एकूण ९४.१ मिलिमीटर

''जिल्ह्यात सरासरी ९४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. काही ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आगामी काही दिवसात पाऊस पडेल अशी आशा आहे. लवकर पाऊस पडून जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या पूर्ण होतील.''-के.एम. तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT