Monsoon esakal
जळगाव

Jalgaon Monsoon News : ‘महावेध’च्या पावसाच्या नोंदीत तांत्रिक दोष; धो धो कोसळूनही शिरूड मंडळ नीरंक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Monsoon News : ऑनलाइन पर्जन्यमानाच्या नोंदीत त्रुटी आढळून येत असल्याने भविष्यात शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने अचूक व योग्य यंत्रणेच्या आधाराने नोंदी घ्याव्यात. बाधित शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात मंगळवारी (ता. १८) मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. (Technical fault in online rainfall records)

जानवे, लोंढवे, वाघोदे, निसर्डी, खडके आदी भागात ढगफुटी सदृश परिस्थिती होती आणि अनेक शेतातील माती, पिके, ठिबक नळ्या असे साहित्य वाहून गेले. महसूल विभागाच्या नोंदी आणि महावेधच्या नोंदीत खूप मोठी तफावत दिसून येत आहे. ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते. शिरूड मंडळात ८१ मिमी, पातोंडा मंडळात ६८ मिमी, मारवड मंडळात ६७ मिमी पाऊस पडला होता.

मात्र ‘महावेध’च्या नोंदीत शिरूड मंडळात पाऊस नीरंक दाखवीत आहे तर पातोंडा १५.५ व ‘मारवड’मध्ये ३७.५ दाखविण्यात आले आहे. त्यामुळे अतिवृष्टीचे निकष लागणार नाहीत. परिणामी, शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. गेल्या दहा ते १५ दिवसांत किती दिवस पाऊस पडला यांच्याही नोंदीत खूप मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे ‘महावेध’ची ऑनलाइन यंत्रणा सदोष आहे. (latest marathi news)

भविष्यात देखील पीक विमा, मदत, नुकसान भरपाई, ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ याबाबत तांत्रिक दोषामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवून तांत्रिक दोष दूर करावेत, अशी मागणी शेतकरी नेते किसान काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, डॉ. अनिल शिंदे, धनगर पाटील, दिनेश पवार यांनी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे केली आहे. निवेदनाची प्रत तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आली आहे.

'‘महावेध’च्या नोंदीत तांत्रिक दोष दिसून आले. याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. तिकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.''- सी. जे. ठाकरे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

युद्धाच्या नव्या टप्प्याला सुरुवात,इस्राईलचा इशारा; लेबनॉनच्या सीमेवर सैन्याची जुळवाजुळव

१२ चौकार, ३ षटकार! Sanju Samson चे खणखणीत शतक; श्रेयस अय्यरच्या संघाला सावरले

Latest Marathi News Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या नेतृत्वात महत्वाची बैठक

SCROLL FOR NEXT