MP Raksha Khadse  esakal
जळगाव

Raksha Khadse: खासदार खडसे- कार्यकर्त्यांतील वादाचा व्हीडीओ व्हायरल! नाथाभाऊंचे नाव घेता, गिरीशभाऊंचे का नाही : कार्यकर्ता

Raksha Khadse: भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतही नाहीत, असा आरोप खासदार रक्षा खडसेंवर करणारा वरणगावातील भाजप कार्यकर्त्याचा व्हीडीओ मंगळवारी (ता. २६) सोशल मीडियावर व्हायरल झाला.

सकाळ वृत्तसेवा

Raksha Khadse : तुम्ही नाथाभाऊ (एकनाथ खडसे) यांचे नाव घेता, परंतु गिरीशभाऊंचे नाव घेत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरतात. भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतही नाहीत, असा आरोप खासदार रक्षा खडसेंवर करणारा वरणगावातील भाजप कार्यकर्त्याचा व्हीडीओ मंगळवारी (ता. २६) सोशल मीडियावर व्हायरल झाला. (jalgaon MP Khadse Worker Argument Video Viral on social media marathi news)

भाजपच्या कोअर कमिटीतील बैठकीत गिरीश महाजनांसमोरच श्रीमती खडसे व कार्यकर्त्यांमधील खडाजंगी या व्हीडीओतून समोर आल्यामुळे अंतर्गत धुसपूस लपून राहिलेली नाही. भाजपच्या जळगाव व रावेर मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गेल्या आठवड्यात पक्षाने ब्राह्मणसभेत जिल्हा बैठक घेतली. त्यानंतर गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात कोअर कमिटीची बैठक झाली, त्यातील हा व्हीडीओ असल्याचा दावा केला जात आहे.

काय आहे व्हीडीओत?

या वेळी पक्षाचे नेते गिरीश महाजन,आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, जळगाव लोकसभा मतदारसंघात संघाच्या उमेदवार स्मिता वाघ यांची उपस्थिती होती. वरणगाव येथील एक कार्यकर्ता रक्षा खडसे यांच्याशी वाद करीत असल्याचे दिसत आहे. तुम्ही एकनाथ खडसे यांचे नाव घेता, गिरीश महाजन यांचे नाव का घेत नाही, असा प्रश्‍न विचारताना दिसत आहे.

प्रत्येकवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन फिरतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यात रक्षा खडसे कार्यकर्त्याला समजून सांगताना दिसत असून ‘तुम्ही खोटं बोलणं बंद करा’ म्हणून त्या सांगत आहेत. गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण कार्यकर्त्याला शांत करताना दिसत आहेत.

आम्ही पक्षाचा प्रचार करणारच आहोत पण स्थानिक उमेदवाराने आम्हाला मदत करणे गरजेचे आहे असे मतही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओ मुळे आता पक्षात खळबळ उडाली आहे. (latest marathi news)

कोण आहे कार्यकर्ता?

याबाबत अधिक माहिती घेतली असता वाद करणारा कार्यकर्ता वरणगाव येथील सुनील काळे असल्याचे सांगण्यात आले. ते भाजयुमोचे माजी प्रदेश उपाध्यक्ष, वरणगावचे माजी नगराध्यक्षही होते. एकेकाळी ते खडसे यांचे विश्‍वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. मात्र खडसे भाजपत असतानाच त्यांच्यात बेबनाव झाला होता. काळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होवू शकला नाही.

अंतर्गत बैठकीतील व्हीडीओ व्हायरल कसा?

भाजप शिस्तप्रिय पक्ष असल्याचे सांगितले जाते. पक्षाच्या बैठकीत पत्रकारांनाही उपस्थित राहू दिले जात नाही. अगदी नुकत्याच झालेल्या ब्राह्मण सभेतील पक्षाच्या बैठकीतही पत्रकारांना बाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. व्हायरल झालेली ही बैठक तर मोजक्याच पदाधिकारी व नेत्यांची होती. त्यात हा वादाचा व्हीडीओ व्हायरल कसा झाला? याबाबतही आता कार्यकर्त्यांत चर्चा सुरू झाली आहे.

व्हीडीओ जुना, नंतर गिरीशभाऊंनीच

नाराजी दूर झाल्याचे सांगितले : खडसे

जिल्हा बैठकीनंतर ही बैठक झाली होती. व्हीडीओ त्या बैठकीतील असून जुना आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघात काम करताना कार्यकर्त्यांच्या तक्रारी असतातच, ते नाराजीही व्यक्त करतात. परंतु, ही नाराजी तत्कालीक असते. या बैठकीत कार्यकर्त्याने नाराजी व्यक्त केली. मात्र, त्याची समजूत काढण्यात आली.

बैठकीनंतर स्वत: गिरीशभाऊंनीच सर्वांची नाराजी दूर झाल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा विषय तेव्हाच संपला आहे. मात्र, अशा प्रकारे अंतर्गत बैठकीतील व्हीडीओ व्हायरल झालाच कसा? असा प्रश्‍न उपस्थित करीत हा व्हीडीओ करणाऱ्यावर कारवाईची मागणी रक्षा खडसेंनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT