जळगाव : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले चित्र असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे दौरे अधिक करीत आहेत. ते कितीही फिरले, थापा मारल्या, तरी आमचेच सरकार येणार. इतकेच नाही, तर हरियानापेक्षा महाराष्ट्रात भाजपचा अधिक दारुण पराभव होईल, असा विश्वास शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी येथे बोलताना व्यक्त केला. खासदार संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. (MP Sanjay Raut statement on BJP will be defeated in Maharashtra more than Haryana )
अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय सामंत उपस्थित होते. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात किती वेळा जावे, याचा शिष्टाचार आहे. शिवाय त्यांनी खोटे बोलणेही बंद करावे. अकोल्यात काँग्रेस अमली पदार्थांच्या पैशावर निवडणूक जिंकत असल्याचे ते खोटे बोलतात. मात्र, गुजरातमध्ये काय चित्र आहे? गुजरातमध्ये ड्रगचा मोठा साठा पकडला. त्यावर पंतप्रधान मोदी बोलत नाहीत, असे श्री. राऊत म्हणाले.
भाषण लिहून देणारे मोदींना बेअब्रू करताहेत
निवडणूक हरताय, म्हणून राज्यात गोड बातम्या देत असल्याचा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला. मोदी यांना भाषण कोण लिहून देतंय माहीत नाही. या भाषणामुळे नरेंद्र मोदी रोज वेगवेगळे बोलत आहेत. भाषणाने त्यांचे अधःपतन होत आहे. भाषण लिहून देणाऱ्या संस्था मोदींना बेअब्रू करीत असल्याचेही श्री. राऊत म्हटले. (latest marathi news)
जळगाव जिल्ह्यातील पाचही जागांवर दावा
जळगाव जिल्ह्यात महविकास आघाडी जागावाटपाबाबत जयंत पाटील यांनी यापूर्वी घोषणा केली होती. त्यावर श्री. राऊत म्हणाले, की जयंत पाटील संयमी नेते आहेत. जागांबाबत ते कोणतेही चुकीची भूमिका घेणार नाहीत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बसून, चर्चा करून आणि सामंजस्याने ही निवडणूक लढविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुलाबराव पाटलांचा पराभव निश्चित
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मशाल चिन्हावर उमेदवार उभा राहणार असून, आम्ही कोणाला आयात करतो की निर्यात याची चिंता गुलाबराव पाटील यांनी करू नये. कोणीही उभे राहिले, तरी त्यांचा पराभव निश्चित आहे, ते आता विधानसभेत जाऊ शकणार नाहीत, असा टोला गुलाबराव पाटील यांना श्री. राऊत यांनी लगावला. पोवाड्याची ते चेष्टा करीत आहेत. गद्दारांवर पोवाडे कोणी करीत नाहीत. वीरांवर पोवाडे लिहिले जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.