Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime : जिल्ह्यातील तिघांवर ‘एमपीडीए’ची कारवाई; पोलिस-महसूल प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर

Crime News : नवरात्रोत्सव व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर पोलिस प्रशासन व महसूल विभाग ‘ॲक्शन मोड’वर आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नवरात्रोत्सव व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर पोलिस प्रशासन व महसूल विभाग ‘ॲक्शन मोड’वर आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा आणि जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची मोठी कारवाई करण्यात आली. यातील एकाला कोल्हापूर, तर इतर दोघांची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाने शुक्रवारी (ता. ४) दिली. (MPDA action against three people in district Police Revenue Administration on Action Mode )

आगामी निवडणूक आणि सणांच्या पार्श्वभूमीवर वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे आणि धोकायदायक व्यक्तींवर आळा बसावा, या अनुषंगाने अमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विशाल दशरथ चौधरी (वय ३२, रा. भोईवाडा अमळनेर), पारोळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुनील ऊर्फ सल्ल्या लक्ष्मण कोळी (२९, रा. पारोळा) आणि जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वैभव विजय सपकाळे (१९, रा. असोदा, ता. जळगाव) यांच्यावर एमपीडीए कायद्यांर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. तो अहवाल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठविला. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी या अवाहलाचे अवलोकन करून एमपीडीए अंतर्गत तिघांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याला मान्यता दिली.

असे गुन्हेगार असे गुन्हे

विशाल चौधरी याच्यावर सात गंभीर गुन्हे दाखल असून, त्याला कोल्हापूर कारागृहात रवाना करण्यात आले. सुनील पाटील याच्यावर ११ गंभीर गुन्हे, तर वैभव सपकाळे याच्यावर ५ गंभीर गुन्हे दाखल असून, दोघांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT