police esakal
जळगाव

Jalgaon Police : निवडणुकांसह दुर्गोत्सवासाठी ‘खाकी’ सज्ज; ‘हद्दपारी’सह एमपीडीएचे प्रस्ताव

Jalgaon Police : जिल्‍हा पोलिसदलाने वाढत्या गुन्हेगारीवर उपाय योजनेसोबतच सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचे हत्यार उपसले.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्‍हा पोलिसदलाने वाढत्या गुन्हेगारीवर उपाय योजनेसोबतच सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचे हत्यार उपसले. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडला जावा, कुठलेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ५६५ गुंडावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सोबतच एमपीडीए आणि तडीपारीचाही तडका पोलिसदलाने दिल्याने गणेशोत्सव शांततेत पार पडला आता दुर्गोत्सव आणि आगामी निवडणुकांसाठी पोलिसांनी कंबर कसली असून, अनेकांचे प्रस्ताव रांगेत असल्याचे सांगण्यात आले. (MPDA proposal with police ready deportation for Durgotsava along with elections )

गणेशोत्सवाची चाहुल लागताच जिल्‍हा पोलिस दलाने दोन महिने आधीपासून रेकॉर्डवरील गुंड गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यास सुरवात केली होती. गणेशोत्सवाच्या काळात तब्बल ५६५ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यात एमपीडीए आणि हद्दपारीच्या प्रस्तावांनाही समावेशीत करण्यात आले. ऐरवी प्रांताधिकाऱ्यांना पाठवल्या जाणाऱ्या प्रस्तावांवर वेळीच निर्णय होत नसल्याने जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना प्राप्त अधिकारात हद्दपारीचा सपाटा पेालिस अधीक्षकांनी चालवला होता. उपविभागीय व प्रभारी अधिकाऱ्यांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे प्राप्त प्रस्ताव तत्काळ मंजूर करुन कारवाई करण्यात आली.

बाप्पासाठी ५६५ गुन्हेगारांवर दंडुका

गणेशोत्सव काळात शांतता राखण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ५६५ रेकॉर्डवरील गुंडावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. इतकेच प्रस्ताव आणखी रांगेत असून कलम-१०७, ११० प्रमाणेच आता हद्दपारी, एमपीडीए आणि मकोकाचे प्रस्तावही रांगेत असल्याचे सांगण्यात आले. दसरा दिवाळी सणासह यंदा विधानसभा निवडणुकांचा कालावधी असल्याने पोलिसदलास डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावण्यासह गुन्हे घडू नये, यासाठी प्रतिबंधक कारवाईचा दांडपट्टा सुरुच ठेवावा लागणार आहे.

जळगाव भागाची कारवाई

गणेशोत्सवात कलम बीएनएस १२६ नुसार ७१ गुंडावर, बीएनएस १२८ नुसार ३, बीएनएस १२९ नुसार ५०, बीएनएस १६३ नुसार ६२, बीएनएस १६८ नुसार २८४, मुंबई पोलिस अधिकनियम - ९३ नुसार २४, टोळी विरोधी कायद्यान्वये ५५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच दोन जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली.अशीच कारवाई येत्या दहा दिवसांत करण्याचे नियोजन वरिष्ठ पोलिस अधीकार्यांसह सर्व उपविभाग आणि प्रभारींना गुन्हे आढावा बैठकीतून सूचित करण्यात आले आहे. (latest marathi news)

दुधारी शस्त्राप्रमाणे वापर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, पंधरा तालुक्यांच्या जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा आणि दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. कुठल्याही क्षणाला विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. परिणामी, पोलिसदल रेकॉर्डवरील गुंड-गुन्हेगारांची चाचपणी करत असतानाच स्थानबद्धता (एमपीडीए), हद्दपारी सारखी कारवाईची शक्यता असलेल्या गुंडांनी राजकीय असरा घेतला आहे.

आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून जिल्ह्यातील आमदार आणि तिन्ही मंत्र्यांकडे अशा कार्यकर्त्यांच्या येर-झाऱ्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकांमध्ये उपद्रवी ठरणाऱ्यांवर पोलिस कारवाई होणारच असली तरी, मंत्री आमदारांच्या छत्रछायेत आल्यावर संबंधित कार्यकर्त्यांकडून निवडणुकांच्या मदतीची हमी झाली आहे. तर, काही प्रकरणात काट्याने काटा काढण्याचाही उद्देश सफल होऊन पोलिसांच्या या कारवाईचा दुधारी शस्त्राप्रमाणे राजकीय मंडळी त्याचा वापर करतील असेही बोलले जात आहे.

''सर्व पोलिस ठाण्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना यासूर्वीच दिल्या आहेत. उपद्रवींवर नेहमीप्रमाणेच कारवाई होते. सण-उत्सव आणि निवडणुकांसाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा ड्राईव्ह घेतला जातो. हा देखील नियमित कामकाजाचा भाग आहे.''- डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्‍हा पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT