Jalgaon Monsoon : शहरातील बाजारपेठेत झालेल्या रिमझिम पावसातच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, परिसरात चिखलाचे साम्राज्य झाले आहे. यामुळे बाजारपेठेत ग्राहकांना चालणेही जिकिरीचे होत आहे. पालिकेने चिखलाबाबत त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे. शहरात पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठ परिसरात खड्डे आहेत. ( Mud in market in first rain Neglect of Parola Municipal )
खड्डे व्यवस्थित बुजले जात नसल्याने, तसेच बऱ्याच ठिकाणी मातीचे ढिगारे असल्यामुळे पावसाचा पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, पहिल्या पहिल्या पावसातच मुख्य बाजारपेठेत डबके साचत आहे. डबक्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढवून साथीच्या रोगांची लागण होऊ शकते, यासाठी पालिकेने मुख्य बाजारपेठेत साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी केली आहे.
गृहिणींचा हिरमोड
मुख्य बाजारपेठेत सर्वत्र चिखल असल्यामुळे बाजारपेठेत खरेदी करताना गृहिणींना चिखलातून जावे लागते. त्यामुळे पालिकेच्या उदासीनतेबाबत गृहिणींनी नाराजी व्यक्त केली. या समस्याकडे पालिकेची होत असलेली दिरंगाईमुळे बाजारासाठी येणारे नागरिक पाय घसरून अनेकांना दुखापती झाल्या आहेत. बऱ्याच वेळा बाजारपेठेतून दुचाकी सुसाट धावली, तर सारा चिखल अनेकांच्या अंगावर व हातगाड्यांवर उडतो. (latest marathi news)
बाजारपेठेतील अनेक पथदीप बंद आहेत. यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढू शकते. बाजारपेठेतील स्वच्छतागृहातील लाईट बंद असल्याने रात्री चाचपडत स्वच्छतागृहात अनेकांना जावे लागते. पालिकेने याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ याबाबत कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी केली आहे.
रस्त्याची डागडुजी करावी
येथील बाजारपेठ वाय आकाराची आहे. तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थ दैनंदिन खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. अजून लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेत ये-जा करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, तसेच चिखलामुळे संभाव्य धोका लक्षात घेता पालिकेने बाजारपेठेतील रस्त्याची त्वरित डागडुजी करून ग्राहकांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.