warehouse located at the rear of the Municipal Corporation's seventeen-storey administrative building Impounded cars stored in warehouses. esakal
जळगाव

Jalgaon Municipal Corporation : सतरा मजलीत अखेर भंगार गुदाम; महासभेतील निर्णयाचीही ऐसीतैसी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिकेच्या महासभेत एखाद्या विषयावर चर्चा होऊन त्या कामाला स्थगिती दिल्यानंतर ते काम प्रशासनाला करताच येत नाही.

ते करावयाचे असल्यास पुन्हा महासभेची परवानगी घ्यावी लागते, असा स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा नियम आहे.

मात्र, महापालिकेत महासभेच्या झालेल्या निर्णयाची ऐसीतैसी करीत प्रशासनाने सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या आवारात जप्त केलेल्या गाड्या ठेवण्यासाठी गुदाम केले आहे.

त्यामुळे आता पुन्हा महापालिकेच्या शहरात असलेल्या मोकळ्या जागा कुणाच्या ताब्यात आहेत, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. (Jalgaon Municipal Corporation Seventeen floors finally scrap warehouse Jalgaon News)

महापालिकेची सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या मागील भागाची आजच्या स्थितीत अत्यंत भंगार अवस्था झाली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त करून आणलेल्या गाड्या याठिकाणी ठेवल्या आहेत. इमारतीच्या आवारातील हे चित्र अत्यंत ओंगळवाणे दिसत आहे.

गुदाम करण्यास विरोध

सतरा मजली इमारतीच्या आवारात जप्त केलेल्या गाड्या ठेवण्यासाठी शेड उभारण्याचे काम सुरू असताना, त्याला विरोध करण्यात आला होता. महासभेत त्यावर चर्चाही झाली होती. भाजपच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

महापालिकेच्या शहरात अनेक जागा त्या ठिकाणी गाड्या ठेवण्यासाठी जागा करावी, असा प्रस्तावही त्यांनी दिला होता. त्यानंतर आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी त्या ठिकाणी गुदाम करण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काम थांबविले, पण

महापालिकेत यावर चर्चा झाल्यानंतर शेड उभारण्याचे काम थांबविले होते. मात्र, काही दिवसांनी शनिवारी, रविवारी महापालिकेला सुटी असल्याचे लक्षात घेऊन मक्तेदाराने त्या ठिकाणी तीन-चार दिवसांत शेड उभारून पत्रेही टाकले आणि या कामाचे बिल मंजूर करण्यात आले.

अखेर झाले गुदाम

शेड उभारणीनंतर बराच काळ त्याचा वापर करण्यात आला नाही. आम्ही काम केलेच नाही, असा दाखविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने सुरूच ठेवला. मात्र, हळूहळू त्याचा जप्त साहित्य ठेवण्यासाठी वापर सुरू झाला. आता त्याठिकाणी जप्त केलेल्या अतिक्रमित गाड्या ठेवल्या आहेत.

...तर महासभेच्या निर्णयाचे काय?

महापालिका प्रशासन महासभेत झालेल्या निर्णयाची अमंलबजावणी न करता आपल्या मनाप्रमाणे काम करीत असेल, तर महासभेच्या निर्णयाचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. महासभेत काम थाबंविण्याचा प्रस्ताव होता, तर काम सुरू करण्यासाठी महासभेत हा विषय आणण्यात आला काय, याचे उत्तरही आता प्रशासनाने देणे आवश्‍यक आहे.

...तर मोकळ्या जागांचे काय?

महापालिकेने शहरातील ३५० संस्थांना जागा दिल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. त्याची माहिती जमा करण्याचे काम सुरू असल्याचेही सांगितले होते. त्यात काही मोकळ्या जागा असल्याचेही सांगण्यात आले होते.

या मोकळ्या जागा संस्थांना काहीही काम नसताना दिल्या जातात आणि महापालिकेच्या सतरा मजली इमारतीत भंगार गुदाम तयार केले जात असेल, तर प्रशासनाच्या कृतीला काय म्हणावे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

आजच्या स्थितीत जुन्या साने गुरुजी रुग्णालयाची मोकळी जागा त्या ठिकाणी सुरक्षारक्षकही नियुक्त केले आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांचीही त्या ठिकाणी नियुक्ती आहे, त्या ठिकाणी जप्त गाड्या का ठेवल्या जात नाही, तसेच शहरात इतर ठिकाणीही जागा आहेत, त्या जागांचा फायदाही महापालिकेला होईल. याचाही विचार प्रशासनाने करण्याची गरज आाहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT