Jalgaon Municipal Corporation  esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार कालबद्ध पदोन्नती; शुक्रवारपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

Jalgaon News : महापालिकेच्या आस्थापना सूचीवरील ३१ डिसेंबर २०२३ अखेर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीसह सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाचा लाभ देण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील महापालिकेच्या आस्थापना सूचीवरील ३१ डिसेंबर २०२३ अखेर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीसह सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय पदोन्नती समितीची बैठक ऑगस्टमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने महापालिकेतील पात्र कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही महापालिकेच्या आस्थापना विभागाने सुरू केली आहे. (Jalgaon Municipality News)

त्यासाठी कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे शुक्रवार (ता. २६)पर्यंत सादर करण्याचे आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे तथा आस्थापना विभागाचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी काढले आहेत. अजूनही अनेक कर्मचाऱ्यांनी ही कागदपत्रे सादर केलेली नाहीत.

त्यामुळे त्यांना कालबद्ध पदोन्नतीसह सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देताना अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व महापालिकेच्या पात्र कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे २६ जुलैपर्यंत महापालिकेच्या आस्थापना विभागात जमा करावी, असे आवाहन उपायुक्त गांगोडे यांनी केले आहे.

अकरा आवश्यक कागदपत्रे लागणार

देय लाभाच्या दिनांकापासून मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल, देय लाभाच्या दिनांकामागील, तसेच २०२३-२४ चे भत्ता व दायित्व विवरणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, देय लाभाच्या पदाची शैक्षणिक अर्हता धारण केल्याची कागदपत्रे, विभागीय परीक्षा उत्तीर्ण. (latest marathi news)

सूट प्रमाणपत्र, संगणक अर्हता प्रमाणपत्र, सूट प्रमाणपत्र, मराठी, हिंदी भाषा प्रमाणपत्र, सूट प्रमाणपत्र, परीविक्षाधीन कालावधी समाप्ती आदेश, स्थायित्व प्रमाणपत्र, ना देय, ना चौकशी प्रमाणपत्र, फौजदारी प्रकरण नसल्याचे प्रमाणपत्र आदी ११ आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

"कर्मचाऱ्यांनी कालबद्ध पदोन्नती, सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे २६ जुलैपर्यंत जमा करावीत. दिलेल्या मुदतीत कागदपत्रे जमा न केल्यास ती स्वीकारण्यात येणार नाहीत. परिणामी, या लाभापासून वंचित राहिल्यास त्यास सर्वस्वी ते जबाबदार असतील." - अविनाश गांगोडे, उपायुक्त, महापालिका, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT