Municipal officials and employees while removing encroachments here on Wednesday. esakal
जळगाव

Jalgaon News : चोपड्याच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण पालिकेने हटविले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चोपडा पालिका हद्दीत २०२२-२०२३ विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शाहू महाराज शॉपिंग सेंटरपासून ते अमरधाम एकपर्यंत रस्ता सेमी ट्रिमिक्स व गटार करण्यासाठी पालिकेने बुधवारी (ता.१९) पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढले. चोपडा नगरपालिका शहर विकास आराखड्यामधील डीपी १८ मीटर रस्ता वरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते अमरधाम रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. (Municipal removed encroachment on main road of Chopda )

यात २६ अतिक्रमणधारक हे या नोटिशीविरुद्ध उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने ३० एप्रिलच्या आत स्वतः हून अतिक्रमण काढायला सांगितले होते. पण या अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे पुन्हा पालिकेने अंतिम नोटीस देऊन मंगळवारी (ता. १८) खुणा करून बुधवारी पोलिस बंदोबस्तात २६ अतिक्रमित झोपड्या काढल्या. (latest marathi news)

काम लवकर व्हावे, यासाठी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना आज (बुधवारी) पालिकेमार्फत पत्र देण्यात आले असून, यात म्हटले आहे, की प्रस्तावित कामाचे ठिकाणी १८ मीटर डीपी रस्त्यावरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले आहे.

तरी हे काम प्रथम प्राधान्याने सुरू करावे, हे काम सुरू करीत असताना चोपडा शहर भुयारी गटर अभिकर्ता पी. दास. इन्फ्रास्ट्रक्चर, प्रा. लि. अहमदाबाद, गुजरात यांचे प्रोजेक्ट मॅनेजर दर्शन हिरपरा, यांच्याशी समन्वय साधून कामास सुरवात करावी. हे अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकारी राहुल पाटील, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्यासह पाच महिला व पाच पुरुष पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT