Water Supply esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : एप्रिलपासून जुना पाणी पुरवठा होणार बंद

Jalgaon : शहरातील अमृतच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आहे. त्यामुळे एप्रीलपासून महापालिका जुन्या जलवाहीनीवरील पाणी पुरवठा बंद करून नवीन जलवहिणीवरुन कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : शहरातील अमृतच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होत आहे. त्यामुळे एप्रीलपासून महापालिका जुन्या जलवाहीनीवरील पाणी पुरवठा बंद करून नवीन जलवहिणीवरुन कायमस्वरूपी पाणी पुरवठा करणार आहे. घरकुलधारकांनी थकबाकी भरून मार्च अखेर रक्कम भरल्यास त्यांना नळ कनेक्शन दिले जाईल, अन्यथा नव्या दर लागू करण्यात येणार आहे. (Jalgaon municipality will stop old water supply from April)

महापालिकेच्या मालकीच्या घरकुलधारकांकडे सेवा शुल्काची १८ कोटी ३३ लाख ७७३ हजार रूपयांची थकबाकी असल्याने त्यांना अद्याप अमृत योजनेतून नळ कनेक्शन दिलेले नाही. अमृतचे नळ देण्यास महापालिका तयार असली तरी त्यासाठी घरकुलधारकांना मागील वर्षाची थकबाकी व चालू वर्षाची रक्कम जमा करण्याची अट आहे. ही थकबाकी भरण्यासाठी ३१मार्च २०२४ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे.

समितीच्या अहवालानुसार धोरण

घरकुलधारकांना अमृतमधुन नळ देण्यासह पाणीपट्टी आकारणीचे धोरण ठरविण्यासाठी महापालिकेने समिती नेमली होती. घरकुलधारकांशी झालेले करारनामे, तत्कालीन नगरपालिका व महापालिकेत झालेले ठरावानुसार घरकुले अहस्तांतरणीय असल्याने अमृत योजनेचे नळ महापालिकेच्या दप्तरी नोंद असलेल्या लाभार्थ्यांच्याच नावाने देण्यात येणार आहे. (latest marathi news)

रक्कम भरा, कनेक्शन घ्या

घरकुल धारकांना थकबाकी भरल्यानंतर मूळ घरकुलधारकांना सेवा शुल्क पावतीचा भरणा करून नळ देण्यात येणार आहे. थकीत सेवा शुल्क रक्कमेपैकी एका वर्षाची थकबाकी रक्कम रुपये एक हजार आठशे पंचवीस तसेच चालू वर्षाची थकबाकी हजार आठशे पंचवीस असे एकूण रक्कम ३६५० रूपये भरावे लागतील.

थकबाकी पूर्ण भरण्यास तयार असल्याचे घरकुलधारकाना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. मार्च अखेरपर्यत जे घरकुलधारक अमृतचे नळ घेणार नाही त्यांना रितसर नवीन मंजुर दराने नळसंयोजन चार्जेस व थकीत संपुर्ण सेवा शुल्क भरणा केल्याचा दाखला अर्जासोबत सादर केल्यानंतरच नळ देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT