Farmer Sandeep Sawle's banana crop destroyed by the storm. esakal
जळगाव

Jalgaon Banana News : मागील वर्षांत 5 वेळा केळीवर नैसर्गिक आपत्ती; रावेर तालुक्यातील चित्र

Jalgaon Banana : विमा कंपनीने केळी उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित अशी १२ कोटी रुपयांची भरपाई अजूनही दिलेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Banana News : तालुक्यात पाच वेळा नैसर्गिक आपत्ती येऊन वर्ष झाले आणि सप्टेंबर महिन्यात आलेल्या पूर अतिवृष्टीने केळीचे नुकसान होऊन आठ महिने उलटले तरीही संबंधित विमा कंपनीने केळी उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित अशी १२ कोटी रुपयांची भरपाई अजूनही दिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत यावर चर्चा झाली, आश्वासने दिली गेली, मात्र तशी अंमलबजावणी अजूनही न झाल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. (Natural disaster on banana 5 times in previous years in district )

तालुक्यात २०२३ - २४ या आर्थिक वर्षात ५ वेळा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पूर यामुळे केळीसह कोरडवाहू पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एप्रिल, मे, जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात हे नुकसान झाले असून, त्यात २४६ गावातील ८४२२ शेतकऱ्यांचे ५६५३ हेक्टर्स केळीसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना विमा भरपाईपोटी १२ कोटी १५ लाख ६४ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

एरवी विमा हप्ता एकच दिवस उशिरा भरल्यानंतरही विमा कंपनी नंतर हप्ता स्वीकारत नाही, विमा कंपनीचे आर्थिक व्यवहार एक दिवसही उशिरा पूर्ण केले तर दंडात्मक कारवाई होते. इथे मात्र केळी उत्पादक शेतकऱ्यांची भरपाई किमान ८ महिन्यांपासून प्रलंबित असून, लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देत आहेत. (latest marathi news)

ही वादळ आणि पूर अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई केव्हा मिळेल याबाबतही विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा अधिकारी स्पष्ट सांगत नाहीत. ती मिळेल किंवा नाही अशीही शक्यता केळी उत्पादक व्यक्त करीत आहेत. याशिवाय अजूनही शेकडो शेतकऱ्यांचे केळी पीक विम्याच्या हवामानानुसार किमान व कमाल तापमानामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही प्रलंबित आहे.

''२०२३ -२४ या आर्थिक वर्षातील कमाल आणि किमान तापमानाच्या नुकसान भरपाईचे पैसे माझ्यासह चिनावल आणि परिसरातील असंख्य शेतकऱ्यांचे बाकी आहेत, आता त्याची भरपाई कंपनीने व्याजासकटच द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरू.''- कुंदा नीळकंठ गारसे, केळी उत्पादक शेतकरी, चिनावल, ता रावेर

''मागील आर्थिक वर्षातील प्रलंबित नुकसान भरपाई व्याजासकट मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे व केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.''- चंद्रकांत भंगाळे, केळी उत्पादक शेतकरी, लोहारा, ता. रावेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT