Pink rickshaw puller lady with her rickshaw esakal
जळगाव

Navratri: रिक्षा चालवून ‘त्या’ सांगताहेत ‘हम भी कूछ कम नही’! ‘पिंक रिक्षा’साठी शहरात विविध ठिकाणी थांबे हवेत, समाजाने साथ द्यावी

Latest Jalgaon News : महिला म्हणून त्यांना काही जुन्या रिक्षाचालकांकडून असहकार्याची भावना असते. मात्र जिद्द, चिकाटी अन् कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्या ‘हम भी कुछ कम नही’ असे सांगत रिक्षा चालवून कुटुंबाचे पोषण करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रिक्षाचालक म्हटले, की खाकी हाफ शर्ट, खिशाला बिल्ला लावलेला व्यक्ती समोर येतो. मात्र, शहरात गेल्या तीन, चार वर्षांपासून काही महिलांनी ‘पिंक’ रिक्षा चालक म्हणून रिक्षा चालविण्याच्या व्यवसायात प्रवेश केला आहे. महिला म्हणून त्यांना काही जुन्या रिक्षाचालकांकडून असहकार्याची भावना असते. मात्र जिद्द, चिकाटी अन् कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्या ‘हम भी कुछ कम नही’ असे सांगत रिक्षा चालवून कुटुंबाचे पोषण करीत आहेत. (navratri 2024 jalgaon pink rickshaw women drivers)

रिक्षा चालविताना गृहिणी, रिक्षाचालक, पुन्हा गृहिणी अशा तिहेरी प्रकारच्या भूमिका एकाच दिवसात वठविताना त्यांची तारांबळ उडते. समाजाची साथ मिळते ती अजून अधिक मिळायला हवी, यासह विविध अपेक्षा त्यांच्या आहेत. शहरात सुमारे ३२ पिंक रिक्षाचालक कार्यरत आहेत.

या महिलांना मराठी प्रतिष्ठानचे विजय वाणी, जमील देशापांडे यांनी या महिलांना पुढे आणत बँकेकडून लोनद्वारे त्यांना रिक्षा चालविण्यास रिक्षा उपलब्ध करून दिल्या. रिक्षामध्ये प्रवासी मिळविण्यापासून त्यांचा संघर्ष त्यांच्या वाटेला दररोज येतो. त्याला त्या तितक्याच जिद्दीने, चिकाटीने तोंड देत आहेत. जळगाव पिंक रिक्षा चालक भगिनींच्या भावना ‘सकाळ’ने नवरात्रोत्सवानिमित्त जाणून घेतल्या.

प्रवासी घेताना विरोध

गीता ठाकरे (पिंप्राळा, सावखेडा रोड) : पिंक रिक्षा चालविण्यास एक वर्ष झाले आहे. स्वावलंबी जीवन जगत असले तरी रिक्षाची प्रवासी सेवा देताना अनेक अडचणी आहेत. शहरात, उपनगरात महिलांच्या पिंक रिक्षांसाठी थांबे (स्टॉप) नाहीत. नियमित रिक्षा थांब्यावर जुने रिक्षाचालक लाऊ देत नाहीत.

लावली तरी ‘रिक्षा पुढे घ्या..’चा तगादा लावतात. प्रवासी घेताना पुरूष रिक्षा चालकांचा विरोध होतो. शहर वाहतूक शाखने पिंक रिक्षासाठी रिक्षा थांबे तयार करावेत. रिक्षा घेताना आम्हाला सबसिडी मिळेल, असे सांगितले होते. ती सबसिडी अद्यापही मिळालेली नाही, ती मिळावी.

कर्जावर सबसिडी मिळावी

जयश्री शिंदे (एसटी वर्कशाप परिसर) : पिंक रिक्षा आम्ही कर्ज घेऊन घेतली आहे. स्वकर्तृत्वावर रिक्षाचा पाच हजारांचा हप्ता आम्ही भरतो. रिक्षा खरेदीनंतर आम्हाला सांगितले होते, की ‘सबसिडी’ मिळेल. मात्र अजूनही सबसिडी मिळालेली नाही.

महिलांच्या रिक्षा स्टॉपची आमची मागणी वर्षभरापासून आहे. ज्यावर आम्ही महिला रिक्षाचालक हक्काने तिथे रिक्षा उभी करून पॅसेंजर भरता येतील. मात्र शहर वाहतूक शाखा, महापालिका रिक्षा थांबा करून देत नाही. प्रवासी मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागते आहे.

अनेक वेळा अयोग्य वागणूक

संगीता बारी (द्वारकानगर) : मी सर्वांत जुनी पिंक रिक्षाचालक आहे. चार वर्षांपासून रिक्षा चालवते आहे. महिला असल्याने अनेक अडचणींचा सामना करते. जुने रिक्षाचालक (पुरूष) हे पिंक रिक्षाचालक महिलांना प्रवासी घेऊ देत नाही. प्रवासी घेण्यावरून अनेक वेळा जुने रिक्षाचालक व आमच्यामध्ये वादावादी होते.

अयोग्य वागणूक पुरूष रिक्षाचालकांकडून मिळते. शहर वाहतूक शाखेने खास महिला रिक्षाचालकांसाठी प्रत्येक ठिकाणी रिक्षा थांबा करावा. जेणेकरून आम्हाला पिंक रिक्षा उभ्या करून प्रवासी घेता येतील. रिक्षा बंद पडली तर त्याचे स्पेअर पार्टस लवकर मिळत नाही, यामुळे रिक्षा बंद ठेवावी लागते. (latest marathi news)

टवाळखोरांचा बंदोबस्त व्हावा

जयश्री पाटील (शिवाजीनगर) : मी फुफनगरी ते जळगाव मार्गावर रिक्षा चालवितो. या मार्गाने पुरूष रिक्षाचालक महिला रिक्षाचालक पाहून अयोग्य शब्द वापरतात. जेणे करून प्रवासी महिलांच्या रिक्षात बसणार नाही. मात्र माझा स्वभाव व नम्रतेची वागणूक पाहून प्रवासी रिक्षात बसतात. काही वेळा रिक्षा खराब होतो. त्यावेळा पुरूष रिक्षाचालक रिक्षा बसलेल्या प्रवाशांना विविध प्रकारे बोलून तुम्ही महिलाच्या रिक्षा बसू नका, असे सांगतात. हे चुकीचे आहे. अशा टवाळखोर पुरूष रिक्षाचालकांचा बंदोबस्त व्हावा.

पोलिस सरंक्षण द्यावे..

साधना बिऱ्हाडे (भादली) : मी वर्षभरापासून पिंक रिक्षा चालवते आहे. युवती म्हणून नवीन काहीतरी करण्यासाठी मी रिक्षाचालक झाले. मात्र जुने रिक्षाचालक हे महिला रिक्षाचालकांशी नेहमी हुज्जत घालतात. प्रवासी घेऊ देत नाहीत. प्रवासी घेण्यासाठी रिक्षा उभी केली तर ‘रिक्षा पुढे घ्या...रिक्षा पुढे घ्या...असे पाढा लावतात. कर्जाचे हप्ते कसे फेडणार, रोजीरोटी कशी मिळवणार. कायद्याने, पोलिसांनी आम्हाला रिक्षाचालक म्हणून व्यवसायासाठी सरंक्षण द्यावे.

शंभर जणींना रिक्षाचालक बनविणार

रंजना सपकाळे (बिबानगर) : मी २०१८ पासून रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करीत आहे. माझी आवड, धाडसामुळे मी अनेक संकटांना आतापर्यंत तोंड दिले आहे. शंभर युवतींना मी रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनाही रिक्षाचालक म्हणून सेवेत आणणार आहे. महिलांही रिक्षा चालविण्याच्या क्षेत्रात मागे नाहीत हे दाखवून देणार आहे.

जेव्हा आम्ही पिंक रिक्षा घेतल्या, तेव्हा रिक्षा बंद पडली तर ती तत्काळ दुरूस्त करण्यास एक मेकॅनिक चोवीस तास राहील, रिक्षा पार्टस त्वरित मिळेल, असे सांगितले होते. मात्र, मेकॅनिकल कधीच वेळेवर मिळत नाही. रिक्षाचे पार्टही आठ, आठ दिवस मिळत नाही. यामुळे आमचा रोजगार बुडतो. घेतलेल्या कर्जावर सबसिडी देण्याचे आश्‍वासन मिळाले होते, तेही पूर्ण झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT