Washed concrete under a bridge near a village. Exposed pillars. esakal
जळगाव

Jalgaon News : उद्घाटनाआधीच पुलाखालील भराव गेला वाहून; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Jalgaon : तालुक्यातील वरणगावनजीक बोदवड मार्गावर नागेश्वर महादेव मंदिर ते सुसरी गावादरम्यान तसेच बोहर्डी ते ओझरखेडा मार्गावर अशा दोन ठिकाणी ओढ्यांवर नवीन पुलांची बांधकामे सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील वरणगावनजीक बोदवड मार्गावर नागेश्वर महादेव मंदिर ते सुसरी गावादरम्यान तसेच बोहर्डी ते ओझरखेडा मार्गावर अशा दोन ठिकाणी ओढ्यांवर नवीन पुलांची बांधकामे सुरू आहेत. मात्र पावसाच्या संततधारेमुळे उद्घाटन होण्याआधीच दोन्ही पुलांखालील भराव वाहून गेल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकम विभागाचे दुर्लक्ष झाल्याची चर्चा असून, वाहनधारकांमध्ये अपघाताची भीती निर्माण झाली आहे. (Neglect of Public Works Department as fill under bridge was washed away before inauguration )

वरणगाव (ता. भुसावळ) जवळील बोहार्डी ग्रामपंचायत हद्दीतील बोहार्डी ते ओझरखेडा मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शेतशिवार ओढ्यावर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. तर बोदवड मार्गावर नागेश्वर महादेव मंदिर ते सुसरी गावादरम्यान सुद्धा नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र सतंतधार पावसाच्या पाण्याने ओढ्यांना आलेल्या पुरामुळे या दोन्ही पुलांच्या खालील कॉक्रिट वाहून गेल्याने पुलांना भगदाड पडल्याचे दिसून येत आहे. पुराच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पुलाचा खालच्या बाजूचा भाग वाहून गेल्याने या पुलांखाली मोठे खड्डे पडले आहेत.

तसेच दोन्ही पुलाचा काही भाग पुराच्या पाण्याने धुवून गेला असून, राहिलेला भागही कमकुवत झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे व विद्यार्थीसह येणारे जाणारे वाहनधारकांमध्ये भीती निर्माण होत आहे. तसेच येथील वाहनचालकांना रात्रंदिवस वाहन चालविताना त्या पुलावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलासाठी निधी मंजूर केला होता; परंतु संबंधित कंत्राटदाराने निकृष्ठ दर्जाचे काम केले. मात्र दुर्दैवाने या कामाकडे दुर्लक्ष झाले असून, पूल तयार झाला. मात्र सध्या धोकादायक स्थितीत आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाबाबत माहिती असूनही त्या जागेवर पाहणी केली नसल्याची चर्चा आहे. तसेच धोकादायक स्थिती असताना या पुलावर दोन्ही बाजूंनी फलकही लावले नसल्याने अपघात होण्याची वाट पाहात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आता तरी पुलाची तातडीने दुरुस्ती करावी व सिमेंट काँक्रिटने पूल बंदिस्त करावा अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

वारंवार तक्रारी करूनही बेदखल

संबंधित कंत्राटदाराने तात्पुरता मुरूमाचा भराव टाकल्याने पुलांच्या दोन्ही बाजूने चिखल आणि दलदल निर्माण झाली आहे. बोदवड रस्त्यावर सुसरी, पिंपळगाव, आचेगाव, गोळेगाव, भागखेडा, साळशिंगी आणि बोदवड, मलकापूर, जामठीपर्यंत आणि बोहार्डी मार्गावरील पुलांवरून वरणगाव, तळवल, काहुरखेडा, बोहार्डी, ओझरखेडा, बेलखेडा, जुनोना आणि बोदवडपर्यंत अशा दोन्ही पुलांवर येणारी आणि जाणारी वाहनांची वर्दळ असते. अशा अवस्थेत जर एखादा रुग्ण या पुलावर आला तर तो दगावण्याची शक्यता आहे. दोन्ही गावाच्या गावकऱ्यांनी पुलांबाबत तक्रार व पत्रव्यवहार केला. मात्र अधिकारी दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.

''संबंधित पूल बांधकाम करताना कंत्राटदारांनी सिमेंट कॉंक्रिट, लोखंडी आसारीने पीसीसी स्ट्रक्चर करणे अपेक्षित होते. मात्र तसे केले नाही. त्यामुळे तात्पुरते सिमेंट, रेतीचे मटेरियल टाकले होते, ते वाहून गेल्यामुळे पुलांचे पिलर जमीत उघडे पडले आहे. आणि रस्त्याला मुरूमाचा भराव केला. मात्र, त्याची दबाई केली नाही. त्यामुळे टाकलेल्या मुरूमात वाहने फसत आहे. पायी चालणाऱ्या देखील त्रास होत आहे.''- रवी पाटील, माजी सरपंच, सुसरी

''सुसरीजवळील पुलाचे बांधकाम ठिकाणी भेट दिली असता पुलाला कोणताही धोका नाही. पूल बांधकाम करताना पाच मीटरखाली फाउंडेशनन स्ट्रक्चर केले आहे.''- वैभव आहिरराव, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT