Sugercane esakal
जळगाव

Jalgaon News : अनुकूल स्थिती असताना ऊस लागवडीकडे दुर्लक्ष; कारखान्याकडूनही पुरेशा सुविधा

Jalgaon : चारही गाळप हंगामाचे अवलोकन केले असता, प्रत्येक गाळपात बारामती ॲग्रोने ऊस बाहेरून आणून गाळप पूर्ण केले आहे.

सुनील पाटील

चोपडा : बारामती ॲग्रो युनिट-४ कडून ऊस लागवडीसाठी योग्य दर्जेदार बियाण्याचा पुरवठा, उसावर पडणाऱ्या पांढरी माशीवर फवारणीसाठी जैविक कीटक नाशकाचा पुरवठा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस दिल्यावर अवघ्या पंधरा दिवसांत उसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग यांसह अन्य सोयीसुविधा उपलब्ध आहेत, असे सर्व काही सोपस्कार करूनही बारामती ॲग्रोने आणखी काय केले पाहिजे, त्यांची आणखी काय चूक आहे? चोपडा तालुक्यासह परिसरात ऊस लागवडसाठी योग्य परिस्थिती असताना ऊस लागवडीकडे दुर्लक्ष होत आहे का? (Neglect of sugarcane cultivation when conditions are favorable Adequate facilities )

आतापर्यंत तीन गाळप झालेले आहेत. यावर्षी चौथा गाळप आहे. या चारही गाळप हंगामाचे अवलोकन केले असता, प्रत्येक गाळपात बारामती ॲग्रोने ऊस बाहेरून आणून गाळप पूर्ण केले आहे. बारामती ॲग्रोने कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन तालुक्याच्या बाहेरून ऊस आणावा लागत आहे. इतर पिकांचे हालअपेष्टा असताना, इतर उत्पादनास हमीभाव नाही, मजुरांची टंचाई आहे, पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न नाही, असे असूनही ऊस लागवडीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांची अनास्था का?

कच्चा माल आवश्‍यकच!

कच्च्या मालाशिवाय कारखाना पूर्ण वेळ चालू शकत नाही. कारखाना पूर्ण क्षमतेने चालेलल पूर्ण हंगाम गळीत होईल, तेव्हाच प्रगती होईल, चोपडा साखर कारखानाच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचे देणे फिटेल. कारखाना पूर्ण क्षमतेने चालला तरच चोसाका १५ वर्षांच्या आधी कर्जमुक्त होवू शकतो. मात्र, यासाठी कारखाना कार्यक्षेत्रात तेवढ्या प्रमाणात ऊस लागवड व्हायला पाहिजे. बाहेरून ऊस आणल्यास बारामती ॲग्रोला वाहतुकीचा खर्चासह इतर खर्च भरपूर येतो, तेव्हा बाहेरून आणलेला ऊस परवडत नाही. त्यामुळे एफआरपीनुसार भाव देण्यास अडचणी निर्माण होतात. (latest marathi news)

ऊस लागवड क्षेत्राची स्थिती

चोपडा तालुक्यात सध्यास्थिती यावर्षी फक्त एक हजार ७०० एकर (५५ हजार टन)ऊस लागवड झालेली आहे. तसे पाहिले तर तालुक्यात सहा हजार हेक्टर म्हणजे जवळपास १५ हजार एकर ऊस लागवड होऊ शकते. जर तालुक्यातील शेतकरी दहा टक्के क्षेत्रातच ऊस लागवड करीत असेल तर चोसाका पूर्ण क्षमतेने कसा चालेल? काही प्रमाणात का होईना, कारखाना चालविण्यासाठी बारामती ॲग्रोला धरणगाव, एरंडोल, अमळनेर, शिरपूर, भडगाव, चाळीसगाव, शहादा, यावल या ठिकाणांहून ऊस आणावा लागत आहे.

कारखाना पूर्ण क्षमतेने चालल्याशिवाय काहीच हातात मिळू शकत नाही. तालुक्यात ऊस लागवडसाठी सर्व काही परिस्थिती चांगली आहे, पाणी चांगले आहे, जमिन चांगले, तर शेतकऱ्यांचा ऊसावरच राग का आहे? इतर पिकांसाठी इतर ठिकाणांहून ते मार्गदर्शन घेतात, मग उसाबद्दल नाराजी का? ही नाराजी भविष्यात चोसाकाला भावेल, याचा फटका चोसाकालाच बसणार आहे.

तोटा शेतकऱ्यांना

तोटा हा बारामती ॲग्रोला होत नाही तर तोटा आपल्याला होतोय. आपण आपल्या अडचणी निर्माण करीत आहोत. ऊस लागवड केल्यास फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांचाच आहे बारामती ॲग्रोचे सर्व कराराप्रमाणे व्यवस्थित आहे. पण तोटा आपलाच आहे. बारामती ॲग्रो सर्व काही करायला तयार आहे. व्यवस्थित केल्यास पंधरा वर्षेऐवजी दहा वर्षांत चोसाका कर्जमुक्त होऊ शकतो. यासाठी ऊस लागवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT