Jalgaon District Cooperative Bank esakal
जळगाव

Ladki Bahin Yojana : जिल्हा सहकारी बँकेत ‘झिरो’ बॅलन्सवर नवीन खाते! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अभिनव योजना

Jalgaon News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (जेडीसीसी) नवीन खाते शून्य रुपयात (झिरो बॅलन्सने) उघडण्याची अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (जेडीसीसी) नवीन खाते शून्य रुपयात (झिरो बॅलन्सने) उघडण्याची अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. (jalgaon New Account with Zero Balance in District Cooperative Bank)

जळगाव जिल्हा सहकारी बँकेत महिला बचत गटांच्या माध्यमातून, ग्रामीण भागातील अनेक महिलांनी अनेक वर्षांपासून खाते उघडले असून, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकेतर्फे जिल्ह्यात कॅम्प आयोजित केले जाणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी दिली. याबाबत बँकेच्या सर्व शाखांना झिरो बॅलन्स योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन केले आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महिलांची बचत खाती आहेत. त्या खात्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम जमा येणार आहे. बँकेने जिल्ह्यातील अनेक खातेधारकांना प्रधानमंत्री किसान योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, जीवन सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येतो आणि विशेषत: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्राहक आमच्यासोबत कायमस्वरूपी जोडला असल्यामुळे जिल्हा सहकारी बँक सर्व खातेधारकांना आपली जिव्हाळ्याची बँक वाटते. (latest marathi news)

त्यामुळे बँकेने कोणतेही शुल्क न आकारता झिरो बॅलन्सने नवीन खाते सुरू करणार आहे. त्याचे तत्काळ आधारकार्ड लिंक केले जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक महिला ग्राहकांनी बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Chhagan Bhujbal : घड्याळाच्या टिकटिकने तरले भुजबळ..! येवला, लासलगाव, विंचूरसह प्रमुख गावाच्या मताधिक्क्याने विजय सोपा

ST Mahamandal : एसटी महामंडळाला दिवाळीत मिळाले २० कोटींचे उत्पन्न

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

SCROLL FOR NEXT