Cotton (file photo) esakal
जळगाव

Jalgaon CCI Centre : कापसाला 7 हजारांपर्यंत भाव वाढीचे चिन्हे; आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी वाढली

Jalgaon CCI Centre : आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाला मागणी आता वाढू लागल्याने कापसाला ८ ते ९ हजारांचा दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात कापूस हंगाम केव्हाच संपला तरी शेतकऱ्यांच्या कापसाला अद्यापही मागणी नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाला मागणी आता वाढू लागल्याने कापसाला ८ ते ९ हजारांचा दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. असे असले तरी सध्या पाच ते साडेसहा हजारांचा दर व्यापारी देत आहे. मागणी वाढल्याने सात हजारांपर्यंत कापसाचे दर जातील असे व्यापाऱ्यांना वाटते. (demand for cotton is increasing at international level)

जानेवारी, फेब्रुवारी कापसाला आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी नव्हती. यामुळे खानदेशातील कापसाला मागणी नव्हती. दरही पाच ते सहा हजारांचा होता. कापसाची विक्री शेतकऱ्यांकडून होत नव्हती. जिनिंग, स्पीनिंग चालकांच्या जिनिंगही एकाच शिफ्टमध्ये सुरू होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी नसल्याचे कपाशी भोवती फिरणारे अर्थचक्र थांबले होते.

स्थानिक शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही. यंदा ‘सीसीआय’चे केंद्र सुरू होऊनही कापसाची आवक वाढलेली नव्हती. शासकीय कापूस खरेदी ७ हजार २० रुपयांनी होत आहे. व्यापारी कापसाला पाच हजार ते ६ हजार ८०० चा दर देत आहेत.

कापूस उत्पादक शेतकरी, जिनिंग चालक, प्रेसिंग चालक, एक्सपोटर असलेली साखळी कापसाअभावी व कापसाला मिळालेल्या अल्पदरामुळे तुटली आहे. २०२३ च्या पावसाळ्यात पावसाने जूनच्या शेवटी हजेरी लावली. जुलैला तो चांगला बरसला.

मात्र ऑगस्टमध्ये पुन्हा मोठा ब्रेक दिल्याने कापसाच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्के घट झाली. त्यातही काही वेळा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा कापसाचा दर्जा खालावला. सुरवातीला सात ते नऊ हजारांपर्यंत भाव कापसाला मिळाला. नंतर मात्र कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावरूनच मागणी कमी झाल्याने कापसाचा दर सहा ते साडेसहा हजारांपर्यंत खाली आला.

डिसेंबरमध्ये ‘सीसीआय’ने कापूस खरेदी काही केंद्रावर सुरू केली असली तरी सात बाऱ्यावर नोंद, पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्डची अट, सोबतच पेमेंट मिळण्यास उशीर आदी कारणांनी काही शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’ केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते.

ज्या शेतकऱ्याला पैशाची गरज होती त्यांनी व्यापाऱ्यांना मिळेल त्या दरात कापूस विकला. सध्या व्यापारी पाच हजार ते ६८०० दर देत आहेत. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढल्याने कापसाला सात हजारांपर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे.

२५ टक्के कापूस घरातच

चांगल्या दराअभावी अद्यापही शेतकऱ्यांनी ५० टक्के कापूस विकला गेला नव्हता. किमान आठ ते नऊ हजारांचा दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. आठ ते नऊ हजार गाठी दररोज तयार होणारा कापूस बाजारात येतो आहे. प्रत्यक्षात पंधरा ते वीस हजार गाठी तयार होणारा कापूस बाजारात विक्रीस येणे गरजेचे आहे. आता केवळ पंधरा टक्के शेतकऱ्यांच्या घरात आहे.

उत्पादनात बारा लाख गाठींची घट

गतवर्षी आक्टोबर ते सप्टेंबर या कापूस वर्षात १९ लाख गाठी तयार करण्यात आल्या. यंदा आतापर्यंत केवळ सात लाख गाठींची निर्मिती झाली आहे. कापूस बाजारात येत नसल्याने कापसावर अवलंबून असलेली सर्वच प्रक्रीया बंद पडल्याचे चित्र आहे.

"आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाची मागणी वाढल्याने किमान सात हजारांपर्यंत चांगल्या कापसाला दर मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गाठीचे दर ५५ हजारांवरून ५७ हजारांवर गेले आहे. सरकी २६०० वरून २८०० वर गेली आहे.शेतकऱ्यांकडे २५ टक्के कापूस शिल्लक आहे. त्यातील पंधरा टक्के कापूस बाजारात येईल."- प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग मिल ओनर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT