Lok Sabha Election  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी नोडल अधिकारी नियुक्त

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी तथा निवडणूक (Election) अधिकारी आयुष प्रसाद यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी एन.आय.सी चे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण चोपडे, प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (महसूल शाखा ) श्रीमती ज्योती गुंजाळ.

निवडणूक विषयक साहित्याच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (सामान्य शाखा ) विजय बनसोडे, वाहतूक व्यवस्थापन तहसीलदार (टंचाई शाखा) विजय सूर्यवंशी, संगणक, इंटरनेट. (Jalgaon District Collector Ayush Prasad appointed nodal officers in background of Lok Sabha elections)

सायबर सुविधेसाठी सहायक संचालक (एनआयसी) महेश पत्की, मतदार जागरूकता (स्विप) जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील आणि सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील असणार आहेत.

ईव्हीएम सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेचे नोडल अधिकारी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, ईव्हीएम व्यवस्थापन तहसीलदार (संजय गांधी निराधार योजना) अनिल पूरे, आदर्श आचार संहितेचे अनुपालन अपर जिल्हादंडाधिकारी एस. आर. कासार, खर्च विषयक नियंत्रण महापालिकेचे मुख्य वित्त अधिकारी चंद्रकांत वानखेडे.

बॅलेट पेपर, पोस्टल बॅलेट व इटीपीबीसचे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) विजयकुमार ढगे, प्रसार माध्यमचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, कम्युनिकेशन नोडल अधिकारी तहसीलदार (टंचाई विभाग) विजय सूर्यवंशी, मतदार यादी तहसीलदार (निवडणूक शाखा) सुनील समदाणे.

निवडणूक तक्रारीचे निवारण आणि मतदार हेल्पलाईन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपेश बिजवार तर निरीक्षकांसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT