Sub Divisional Police Officer Sunil Nandwalkar during the review meeting. esakal
जळगाव

Jalgaon News : शिवजन्मोत्सव शांततेत साजरा करा : डीवायएसपी नंदवाळकर

Jalgaon : राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (ता. १९) सर्वत्र साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रम होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (ता. १९) सर्वत्र साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिवजन्मोत्सव शांततेत साजरा करा, असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी केले. (Jalgaon DYSP Sunil Nandwalkar statement Celebrate Shivjanmotsav in peace)

येथील पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १६) पारोळा पोलिस ठाणे येथे आयोजित शिवजयंतीनिमित्त बैठकीप्रसंगी बोलत होते. या वेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. शांताराम पाटील, शहराध्यक्ष महेश पाटील, शीतल ॲकॅडमीचे संचालक रवींद्र पाटील यांच्यासह शहरातील मराठा सेवा संघ व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांबाबत माहिती दिली. या वेळी उपविभागीय अधिकारी नंदवाळकर म्हणाले, की तालुक्यात आजवर अनेक सण, उत्सव, जयंती मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आले आहेत.

या प्रत्येक सोहळ्यात सर्वजण सर्व समावेशकपणे साजरा करीत असतात. तसेच शिवजन्मोत्सव सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सर्व शिवप्रेमी यांनी शांततेत साजरा करावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

या वेळी गोपनीय विभागाचे महेश पाटील यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी पोलिस कर्मचारी किशोर भोई यांनी सहकार्य केले. दरम्यान, बैठकीनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी शिवतीर्थ येथे भेट देत विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT