Jalgaon News : जामठी (ता.बोदवड) ग्रामपंचायतीत काल विस्तार अधिकारी सुनील सोनवणे यांनी ग्रामपंचायत मधील कपाटाचे कुलूप तोडून नविन ग्रामसेवक दिलीप सुरवाडे यांच्या कडे चार्ज दिला. तत्कालीन ग्रामसेवक गोविंद राठोड यांनी वरिष्ठांनी बदलीचे आदेश दिल्यावरही त्यांनी पदभार न सोडल्याने ही कारवाई करण्यात आली. (jamathi Extension Officer Sunil Sonawane broke lock of cupboard and handed over charge to new Gram Sevak Dilip Surwade)
बोदवड तालुक्यातील जामठी येथील सरपंच शांताबाई पाटील यांनी ग्रामसेवक गोविंद राठोड यांची तीन महिने आधी ग्रामविकास अधिकारी निशा जाधव व विस्तार अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे बदलीची मागणी केली होती लेखी अर्जाद्वारे त्यांनी ग्रामसेवक राठोड यांच्यावर सतत गैरहजर राहून कामातही कसूर करणे. सरपंचांना विश्वासात न घेता बाहेरच्या बाहेर परस्पर काम करण्यासह अनेक तक्रारी होत्या.
तक्रारीची दखल घेत ग्रामविकास अधिकारी निशा जाधव यांनी ग्रामसेवक इंगळे यांना जामठी कार्यालय सांभाळण्याचा आदेश दिला होता. परंतु ग्रामसेवक राठोड हे बदलीचे आदेश स्वीकारत नव्हते. त्यांच्या बदली संदर्भात दिलेल्या नोटीस त्यांनी स्वीकारल्या नाहीत.
काही सदस्यांना इंगळे ही नको होते तर काही सदस्यांनी ग्रामसेवक इंगळे यांची मागणी लावून धरली होती. यांच्या वादामुळे इंगळे यांना पदभार दिला नाही. त्यानंतर विस्तार अधिकारी यांनी येवती येथे कार्यरत ग्रामसेवक गणेश चोले यांना आदेश देण्यात आले.
परंतु त्यांच्याकडे आधीच चार गावांचा कार्यभार असल्यामुळे त्यांनी अधिकारी यांचे आदेश नाकारले. परिणामी, पंधरा दिवसांनी दिलीप सुरवाडे यांना आदेश देऊन विस्तार अधिकारी सुनील सोनवणे यांच्या उपस्थितीत जामठी येथील कार्यालयीन पदभार सोपवण्यात आला.
उपसरपंच शेख मुनाफ , सतीश पाटील,नितीन महाजन,लिपीक भागवत पाटील दीपक पाटील, विशाल ठाकुर, विकास पाटील, जितेंद्र पारधी उपस्थित होते. तत्कालीन ग्रामसेवक राठोड यांच्या गैरहजेरीत विस्तार अधिकारी सोनवणे यांच्या उपस्थितीत कपाटाचे कुलूप तोडून नविन ग्रामसेवक दिलीप सुरवाडे यांना चार्ज दिला.
दरम्यान कपाटात कागदपत्रे न आढळल्याचे नवीन ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कपाटातील कागदपत्रे गेली कोठे असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांत अनियमितता असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.