Jalgaon News : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल तहसिलदारांची बनावट सही केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल सहाय्यक गजानन नरोटे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
‘सकाळ’ ने मंगळवारी (ता.२०) ‘कुंपणानेच खाल्ले शेत, तहसीलदारांच्या बनावट सहीने नजराणा हडप’ अशा आशयाचे वृत दिले होते. त्याची दखल घेत आज आदेश काढण्यात आले आहेत. (Revenue Assistant Tehsildar suspended)
जिल्हाधिकारी कार्यालयात बनावट स्वाक्षरी करून केले महसूली रकमेचे नुकसान संचिके संदर्भातील सर्व कामकाज व संचिकेचे अभिलेख जतन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेतील महसूल सहाय्यक गजानन नरोटे याच्याकडे होती.
नरोटे यांनी तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांची बनावट स्वाक्षरी केली होती. हा प्रकार उघड झाल्यानंतर लोखंडे यांनी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला.
नवीन अविभाज्य शर्थीच्या जमिनीचे भोगवटा वर्ग १ मध्ये रूपांतर करून कृषीक विक्रीसाठी परवानगी पत्रावर तसेच विक्रीच्या आदेशावर महसुल सहायकाने तहसीलदारांची बनावट सही केल्याप्रकरणी महसूल सहायक गजानन नरोटे याला जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.