Jalgaon Municipality News : शीतल कलेक्शन या रेडिमेड कपड्याच्या इमारतीवर महापालिका सोमवारी बांधकाम तोडण्याची कारवाई करून वाहनतळ करण्याची धडक कारवाई करणार आहे. महापालिकेने यासंदर्भात त्यांना नोटीस बजावली.
महापालिका आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांनी आज ही नोटीस बजावली आहे. (Jalgaon Notice to Shital Connection of Municipal Corporation Action to demolish construction in basement)
महापालिकेने शीतल कनेक्शनला बजावलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, तळघरात वाहनतळ जागा दाखविण्यात आली आहे. परंतु आपण त्याठिकाणी त्याचा वापर केल्याचे आढळून आले नाही. याबाबत कारवाई करून आपले दुकान सील करण्यात आले होते.
त्यानंतर आपण वाहनतळ करण्यात येईल अशी हमी दिली. त्यामुळे आपणास काही दिवसाची मुदत देवून सील काढण्यात आले. मात्र त्यानंतर आपल्याला दिलेल्या वेळेतही आपण काहीच केलेले दिसून आले नाही.
त्यामुळे आपणास अंतिम कळविण्यात येत आहे की, महापालिका सोमवार (ता.४) आपल्या इमारतीत रॅम्प तयार करून वाहनतळ तयार करण्याची कारवाई करणार आहे. त्यावेळी आपले आर्किटेक्ट, इंजिनिअर, हजर ठेवावे त्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात येईल. या संपूर्ण कारवाईचा खर्च महापालिका आपल्याकडून वसूल करणार आहे.(latest marathi news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.