Crowd of devotees for darshan. in second photo Devotees taking advantage of Bhandara. esakal
जळगाव

Gajanan Maharaj : गजानन महाराज प्रकट दिनी कार्यक्रम; अभिषेक, महाआरतीतून वंदन

Gajanan Maharaj : संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज शहरातील विविध मंदिरांमध्ये कार्यक्रम पार पडले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज शहरातील विविध मंदिरांमध्ये कार्यक्रम पार पडले. पहाटेपासून पूजाभिषेक, महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप झाले. भक्तांनी ‘गण गण गणात बोते..’चे गुणगान करत सामूहिक पारायणे केली. हजारो भाविकांनी महाराजांचे दर्शन घेतले.

शेगाव निवासी गजानन महाराजांचा मोठा भक्तसमुदाय खानदेशासह संपूर्ण महाराष्ट्रात आहे. शेगावचे महाराजांचे संस्थान देशभरातील तीर्थक्षेत्रांमध्ये आदर्श ठरावे, असे आहे. (Jalgaon occasion of Sant Gajanan Maharaj Manifestation Day programs were held in various temples in city)

महाराजांचा महिमाही अगाध असल्याने विशेषत: खानदेश, विदर्भा लाखोंच्या संख्येने त्यांचे भक्तगण आहेत. त्यामुळे त्यांचा प्रकटदिन, गुरुपौर्णिमा हे औचित्य भक्तांसाठी पर्वणी असतात. रविवारी महाराजांचा प्रकट दिन असल्याने जळगाव शहरातील गजानन महाराज मंदिरांमध्ये सकाळपासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल होती.

शाहूनगरातील शाहू हॉस्पिटलच्या प्रांगणातील मंदिरात पहाटेपासून महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. सकाळी पूजाभिषेक होऊन महाआरती झाली. दुपारी ११ वाजेपासून ३ वाजेपर्यंत हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

आदर्श नगरातील मोहाडी रोड परिसरात महाराजांचे मोठे मंदिर आहे. त्याठिकाणीही शनिवारी सायंकाळी महाजारांच्या मूर्तीची शोभायात्रा निघाली. तर रविवारी पहाटेपासून धार्मिक विधी, पूजा, आरती होऊन महाप्रसादाचे वाटप झाले. सायंकाळी व रात्री कीर्तन, भक्तिगीतांचा कार्यक्रमही रंगला. (latest marathi news)

भक्तांनी केली पारायणे

श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यावर भक्तांचा भर असतो. एरवी शुद्ध पक्षातील दशमीला ग्रंथाचे पारायण सुरु करुन द्वादशीला त्याची सांगता केली जाते. किंवा मंगळवारी सुरु करुन गुरुवारी समारोप केला जातो. प्रकट दिनाला मात्र असंख्य भाविकांनी एका दिवसाचे सारांश ग्रंथ पारायण केले.

रेल्वे कॉलनीतील नवसाचा गणपती मंदिर परिसरात सुरभी महिला मंडळाच्या सदस्यांनी श्रीमती सुनीता सातपुते यांच्या निवासस्थानी सामूहिक पारायण केले. अन्य काही ठिकाणीही अशी पारायणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT