Agar of Chalisgaon State Transport Corporation. esakal
जळगाव

Jalgaon News : चाळीसगाव आगाराला पावला विठोबा! आठवडाभरात 29 लाखांचे उत्पन्न

Jalgaon News : एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारातून विशेष बस सोडण्यात आल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

अजय कोतकर : सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारातून विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. जवळपास ३० बसेसच्या माध्यमातून सुमारे १३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. ११ ते १८ जुलै या पंचमी ते एकादशीपर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत आगाराला सवलतींसह एकूण २८ लाख ९७ हजार २२६ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, अशी माहिती आगारप्रमुख मयूर पाटील यांनी दिली.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनाला लाखो वारकरी पायी दिंडीद्वारे जातात. मात्र, ज्यांना पायी जाणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी येथील बस स्थानकातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले होते.

त्यासाठी ११ जुलैपासून २५ बसेस राखीव ठेवण्यात आल्या होत्या. आठ दिवसांच्या कालावधीत एकूण १४६ फेऱ्या झाल्या. ज्या ४८ हजार २४५ किलोमीटर धावल्या. त्यात विना सवलत व सवलतीसह २८ लाख ९७ हजार २४५ रुपये उत्पन्न मिळाले, असेही आगार प्रमुख मयूर पाटील यांनी सांगितले.

वेळेचे नियोजन

आपल्या कुटुंबीयांसमवेत ५ ते १२ वयोगटातील लहान मुला-मुलींनी देखील प्रवास केला. भाविकांची येण्या-जाण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पंढरपूरला जाण्यासाठी आणि तेथून येण्यासाठी बसेसच्या वेळेचे नियोजन करण्यात आले होते. (latest marathi news)

"चाळीसगाव आगारात एकूण ६४ बसेस आहेत. दररोज २२५ फेऱ्या होतात. यात लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला तसेच ग्रामीण फेऱ्यांचा समावेश आहे. साधारणतः २० हजार ९०० किलोमीटर या बसेस धावतात. त्याद्वारे दररोजचे किमान पाच लाख रुपयांपर्यंत आगाराला उत्पन्न मिळते. यासाठी चालक, वाहकांसह आगारातील कर्मचारी व प्रवाशांचे योगदान लाभले आहे."- मयूर पाटील, आगारप्रमुख, चाळीसगाव

आगारातील स्थिती दृष्टीक्षेपात

एकूण बसेस ......... ३०

एकूण प्रवासी ........ १३ हजार

एकूण फेऱ्या ......... १४६

एकूण किलोमीटर .... ४८ हजार २४५

एकूण उत्पन्न .......... २८ लाख ९७ हजार २२६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT