Traffic jam on National Highway at Parola on Sunday. esakal
जळगाव

Jalgaon News: राष्ट्रीय महामार्गावर एक तास वाहतुकीची कोंडी! पारोळा येथे वाहनधारकांसह प्रवाशांची गैरसोय झाल्याने तीव्र नाराजी

संजय पाटील

पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग ५३वर आज रविवारी (ता.३०) आठवडी बाजार होता. त्यामुळे बसस्थानक ते अमळनेर नाका चौफुलीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्यात तब्बल एक तासानंतर कोंडी दूर होऊन वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, नेहमीच्या या वाहतुकीच्या कोंडीबाबत वाहनधारकांसह प्रवाशांनी नाराजी व्यक्त करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना कायमस्वरूपी पोलिसांनी करावी, अशी अपेक्षा शहरातून व्यक्त करण्यात येत आहे.(Jalgaon One hour traffic jam on national highway at Parola)

येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३वर अवजड वाहनांसह इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी होती. त्यामुळे वारंवार या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. परिणामी अनेक जणांना आपला जीवदेखील गमवावा लागला होता. त्यामुळे या महामार्गावर बायपास करण्याची मागणी करण्यात आली.

त्या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरण यांनी तरसोद ते फागणे असा बायपास तयार करून वाहतुकीची कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पारोळा शहराचा बायपास म्हसवे फाटा ते सत्यनारायण मंदिर परिसरालगत असा आहे. मात्र, अनेक अवजड वाहने जुन्या रस्त्यावरूनच वाहतूक करीत आहेत.

त्यामुळे नेहमीच राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी जाणवू लागते. दरम्यान, आज रविवारी (ता.३०) पारोळा शहराचा आठवडी बाजार होता. त्यातच जनावरांचा व कैरीबाजारही असल्यामुळे ग्राहकांसह महिलांची मोठी वर्दळ जाणवू लागली. त्यातच राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यालगतच अनेकांनी दुचाकी व इतर वाहने लावल्यामुळे कजगाव नाका ते अमळनेर चौफुली हा रस्ता एकदमच अरुंद झाला.

परिणामी अनेक वाहने यांना तात्कळत गर्दीतून वाहने काढावे लागले. त्यातच आज लग्नसराईची मोठी धामधूम होती. मात्र, अनेक प्रवासी खासगी वाहनांमध्ये व बसमध्ये वाहतुकीच्या कोंडीत अडकल्याने त्यांनी महामार्ग पोलिसांच्या नियोजनशून्य कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. (latest marathi news)

रहदारीचा चौफुली पोलिसांची कुमक आवश्यक

लग्नसराई असो की, इतर दिवसही राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होताना दिसून येत आहे. कजगाव चौफुलीवरदेखील नेहमीच कोंडी दिसून येते. मात्र, आता अमळनेर चौफुलीवरही वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे पोलिसांनी या वर्दळीच्या चौफुलीवर वाहतूक पोलिस तैनात करून वाहतुकीची कोंडी दूर करावी, अशी अपेक्षा वाहनधारकांसह प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

कोंडीमुळे अनेक बसगाड्या बायपास

रविवारी सकाळी अकराच्या सुमारास अमळनेर चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. यावेळी लांब पल्ल्याच्या अनेक बसचालकांनी कोंडी लक्षात घेता आपल्या बसगाड्या बायपासमार्गे घेऊन जाणे पसंत केले. त्यामुळे अनेक शहरातील प्रवाशांना नाईलाजाने बसस्थानकावर न येता रस्त्यावरच उतरावे लागले.

"राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा बेकायदेशीरपणे वाहनांच्या बाबतीत कारवाई करूनदेखील अनेक वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे कोंडी निर्माण होते. रस्त्यावर सावधगिरीने किंवा वाहनांसोबत शिस्तीने रस्ते ओलांडले तर कोंडी होणार नाही. रस्त्यावर वाहन दिसताच त्यांच्यावर कारवाई केली जाईल." - सुनील पवार, पोलिस निरीक्षक, पारोळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT