Leaking roof and plastic sheeting of rural hospital. esakal
जळगाव

Jalgaon News: पाचोरा ग्रामीण रुग्णालय ‘व्हेंटिलेटर’वर! इमारतीस गळती, औषधी, उपकरणांचे नुकसान; रुग्ण त्रस्त, अधिकारी सुस्त

Jalgaon News : महागडी वैद्यकीय उपकरणे व औषधीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. रुग्ण कमालीचे त्रस्त झाले असले तरी संबंधित अधिकारी मात्र सुस्त असल्याने समाजमनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील शहर व तालुक्यातील रुग्णांना संजीवक व दिलासादायी असलेले ग्रामीण रुग्णालय विविध समस्या व असुविधांमुळे ‘व्हेंटिलेटर’वर असून, रुग्णालयाच्या इमारतीस गळती लागल्याने कर्मचारी प्लॅस्टिक कागदाच्या खाली बसून कामकाज करीत आहेत. यामुळे महागडी वैद्यकीय उपकरणे व औषधीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. रुग्ण कमालीचे त्रस्त झाले असले तरी संबंधित अधिकारी मात्र सुस्त असल्याने समाजमनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. (Pachora Rural Hospital in Bad Condition)

येथील ग्रामीण रुग्णालयासंदर्भात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सेवाभावी संस्था, संघटनांचे पदाधिकारी, रुग्ण, त्यांचे नातलग यांच्याकडून सातत्याने तक्रारी होऊन योग्य त्या वैद्यकीय सुविधांची मागणी होत आहे. तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असले तरी त्याच्या उभारणीची कार्यवाही अजून सुरू न झाल्याने हजारो गोरगरीब, सामान्य रुग्णांना ग्रामीण रुग्णालय हा एकच आशेचा किरण आहे.

त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात सातत्याने रुग्णांची गर्दी असते. सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्दी, ताप, खोकला, हगवण, पोटदुखी, अंगदुखी अशा आजारांचे प्रमाण वाढल्याने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसंख्या ही दिवसागणिक वाढत आहे. असे असताना येथे योग्य ती रुग्णसेवा मिळत नसल्याचे चित्र आहे.

किरकोळ पावसामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीस गळती लागली आहे. त्याचा रुग्णांना प्रचंड त्रास व मनस्ताप सोसावा लागत असून, कर्मचाऱ्यांना देखील प्लॅस्टिक कागदाखाली बसून कामकाज करावे लागत आहे. इमारतीत गळती लागल्याने महागडी वैद्यकीय उपकरणे, औषधी यांच्या नुकसानीची भीती व्यक्त होत आहे.

या रुग्णालयातील पलंग, स्ट्रेचर, याशिवाय रुग्णांसाठी आवश्यक साहित्य सामग्री तुटली आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील व पायरीवरील फरशा तुटल्या असून, गंभीर रुग्णांची ने-आण करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते.

गेल्या पाच, सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त पाचोरा येथे आले असता वरखेडी रस्त्यावरील नियोजित उपजिल्हा रुग्णालयाचे त्यांनी ऑनलाइन भूमिपूजन केले होते. (latest marathi news)

त्या संदर्भातील कार्यवाही सुरू असली तरी जोपर्यंत उपजिल्हा रुग्णालय होत नाही, तोपर्यंत ग्रामीण रुग्णालय हेच गोरगरिबांसाठी आशादायी ठरणार असल्याने या इमारतीची डागडूजी करून रुग्णांसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

येथील नेत्र, दंत, एक्स-रे यासारखे विभाग अजूनही कुलूप बंद आहेत. कारण त्या विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत. पुरेसा आरोग्यसेवक कर्मचारी नाही. त्यामुळे लोकांना योग्य ती सेवा मिळत नसल्याने बहुतांश रुग्णांना जळगाव शासकीय रुग्णालयात हलविले जाते. अथवा रुग्णांना खासगी रुग्णालयात पैसा खर्च करून उपचार घ्यावे लागतात.

या रुग्णालयात पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करावेत, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिसरात घाण, दुर्गंधीचा उपद्रव होत असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण रुग्णालयात ‘ओपीडी’साठी तीन डॉक्टर नियुक्त असले तरी ते वेळेवर हजर नसतात, अशाही तक्रारी होत असल्याने या रुग्णालयाची दुरवस्था व असुविधांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी रास्त अपेक्षा रुग्ण व त्यांच्या नातलगांकडून व्यक्त होत आहे.

"पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची इमारत नगरपालिकेने बांधकाम विभागाकडे वर्ग केली आहे. त्यामुळे इमारतीची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. त्यांना इमारतीच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. बांधकाम विभागाच्या वतीने प्राधान्याने इमारतीची डागडूजी करून घेतली जाईल."

- डॉ. सतीश टाक, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT