While questioning the patients at the Primary Health Center on Wednesday, District Health Officer Dr. Dr. Sachin Bhayekar, District Epidemiology Officer. Babasaheb Wabhale, Resident Medical Officer Dr. Supe, Dr. Pradeep Lasurkar, Dr. Archana Patil, Dr. Madhuri Mahajan etc. esakal
जळगाव

Jalgaon News : विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या शंभरावर; पाणीपुरी विक्रेता ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कमळगाव (ता. चोपडा) येथील आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या आता शंभरावर पोचली आहे. त्यांच्यावर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रांत व चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पाणीपुरी विक्रेता महेंद्र सुरेश इंगळे (रा. पारगाव) यास अडावद पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ( number of poisoned patients is over 100 in village )

सोमवारी (ता. १७) चांदसणी, कमळगाव, पिंप्री, मितावली येथील ग्रामस्थांना पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे मंगळवारी (ता. १८) लक्षात आले. त्यापैकी काहींवर अडावद व ३४ रुग्णांवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप लासूरकर, डॉ. अर्चना पाटील, डॉ. माधुरी महाजन, डॉ. किरण गांवडे, विजय देशमुख यांच्यासह अडावद, चांदसणी, मंगरूळ, वर्डी, धानोरा, गोरगावले, लासूर, चहार्डी येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कालपासून तळ ठोकून आहेत.

दरम्यान, या प्रकरणी पाणीपुरीविक्रेता महेंद्र इंगळे (पारगाव ता. चोपडा) याला अडावद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, ग्रामविकासमंत्री डॉ. गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता. १९) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांच्याशी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या घटनेबाबतचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेला आवश्‍यक त्या उपचाराच्या सूचना दिल्याचे सांगितले. (latest marathi news)

जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांची अडावद आरोग्य केंद्राला भेट

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी बुधवारी अडावद येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस करीत सुरू असलेल्या उपचाराबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. अडावदसह परिसरातील हॉटेलचालकांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नोटिसा देण्यासह आवश्‍यक त्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी त्यांच्यासमवेत जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाबासाहेब वाभाळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुपे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रदीप लासुरे, अडावद केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील, डॉ. माधुरी महाजन उपस्थित होत्या.

''आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने त्रास झालेल्या रुग्णांची संख्या शंभरावर पोचली आहे. या सर्व रुग्णांना अतिसाराचा त्रास जाणवत आहे. त्यापैकी काहींवर अडावद आरोग्य केंद्रात व चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांवर सलाईनसह आवश्‍यक तो उपचार सुरू असल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णांचे घेतलेले नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. रुग्णांवर उपचारासाठी पुरेसा औषधीसाठा, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अशी आवश्‍यक ती यंत्रणा २४ तास उपलब्ध आहे.''-डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT