Bikes parked in the bus stand area. esakal
जळगाव

Jalgaon News : पारोळा बसस्थानक बनले वाहनतळही; चालकवाहकांसह प्रवाशांनाही त्रास

Jalgaon : ग्रामीण भागातील बसगाड्यांसह नागपूर ते गुजरात, नागपूर ते मुंबई यांसह इतर लांब पल्ल्याच्या बसगाड्याही ये-जा करतात.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील राष्ट्रीय महामार्ग ५३वर बसस्थानक आहे. या स्थानकातून तालुक्यातील ग्रामीण भागातील बसगाड्यांसह नागपूर ते गुजरात, नागपूर ते मुंबई यांसह इतर लांब पल्ल्याच्या बसगाड्याही ये-जा करतात. मात्र, सध्या या बसस्थानकात बसऐवजी खासगी दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठीच वर्दळ दिसत आहे. त्यामुळे हे बसस्थानक दुचाकी किंवा चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ बनले आहे की काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. ( bus stand has become parking lot causing inconvenience to drivers and passengers )

सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. त्यातच राज्य सरकारने महिलांसाठी बसच्या प्रवासभाड्यात पन्नास टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे रोज बसगाड्या पूर्णपणे भरलेल्या‌ दिसतात. मात्र, स्थानकात बस येताना स्त्यावरच खासगी दुचाकी व चारचाकी उभ्या असतात. त्यामुळे वाहक व बसचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच स्थानकात बसगाड्यांचीही एकदम गर्दी होत असल्याने प्रवाशांना धावपळ करीतच बसमध्ये बसावे लागत आहे.

शिवाय बस स्थानकात लावकाता चालकांसह वाहकांना अनेक अडचणी येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून येथील बसस्थानक परिसराचे काम सुरू आहे. मात्र, ते काम कासवगतीने सुरू असल्याने याबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ये-जा करणाऱ्या बसगाड्यांना स्थानकात आणताना व बाहेर घेऊन जाताना चालकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. (latest marathi news)

त्यातच बसस्थानकात अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बस स्थानकापर्यंत नेताना चालकांत व दुचाकीमालकांत ‘तू तू मैं मैं’ झाल्याचे प्रसंगही आता नेहमीचेच झाले आहेत. त्यामुळे स्थानक प्रवेश मार्गावरील डाव्या व उजव्या बाजूस उभ्या राहणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सरकारी व खासगी कर्मचारी ये-जा करतात. म्हणून आपले वाहन बसस्थानकातच लावतात.

त्यामुळे त्यांचीही वाढती संख्या पाहता स्थानिक बसस्थानक प्रमुखांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्‍यक त्या उपाययोजना करून बसस्थानकात येताना व जाताना चालकवाहकांसह प्रवाशांची होणारी अडचण दूर करून बसस्थानकात होणारी वाहनांची कोंडी त्वरित दूर करावी, अशी मागणीही केली जात आहे.

''बसस्थानकातील वाहनांबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. खासगी वाहन लावणे हे बेकायदेशीर आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांनी वाहतुकीस अडथळा होईल. म्हणून असे न करता खासगी वाहनधारकांनी बसस्थानकात आपली वाहने लावू नयेत.''- सी. एम. पाटील, वाहतूक नियंत्रक, पारोळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT