Paver block installed at AIR CHOWK & Asphalt patchwork for repair of cement road between Nerinaka to Ajantha Chowk. esakal
जळगाव

Jalgaon Road Damage : डांबरी रस्त्यावर पेव्हर ब्लॉक, कॉंक्रिटवर डांबराचे पट्टे अयोग्यच! तज्ज्ञांची ठाम भूमिका

Latest Jalgaon News : डांबरी रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकणे किंवा कॉंक्रिटीकरण झालेल्या मार्गावर डांबरी पट्टे मारणे अतांत्रिक तर आहेच; शिवाय रस्त्यांमधील खड्ड्यांची स्थिती आणखीच बिकट करणारी आहे, अशी स्पष्ट भूमिका या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Road Damage : शहरातील महामार्ग व अन्य रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा निधी खर्च करून होणारी डागडुजी तात्पुरती आणि न टिकणारी आहे. डांबरी रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकणे किंवा कॉंक्रिटीकरण झालेल्या मार्गावर डांबरी पट्टे मारणे अतांत्रिक तर आहेच; शिवाय रस्त्यांमधील खड्ड्यांची स्थिती आणखीच बिकट करणारी आहे, अशी स्पष्ट भूमिका या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडली आहे. (Paver block on asphalt road stripes on concrete inappropriate)

गेल्या काही वर्षांत जळगाव शहरात व परिसरात तयार झालेल्या रस्त्यांच्या काही काळातच झालेल्या दुरुस्थेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गाची वर्षभरात झालेली दुरवस्था, त्यावरील खड्डे, शहरातील विविध भागात तसेच प्रमुख मार्गांचे काम होत असताना त्यासाठी वापरली जाणारी तांत्रिक पद्धत या सर्व बाबी संशयाच्या भोवऱ्यात आहेत.या रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखला गेला नाही, गुणवत्तापूर्ण काम झाले नाही, तांत्रिक बाबी न पाहता कसेतरी काम पूर्ण करण्यात आल्याचा आरोप महामार्गाच्या संदर्भात नेहमीच होत आला आहे.

अपघातांमुळे दुरुस्तीचा मुद्दा

विशेषत: जळगाव शहरातील महामार्गाच्या दुरुस्तीचा मुद्दा या मार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे अधिक तीव्रपणे चर्चेत आला आहे. गेल्या महिन्यात तीन- चार मोठे अपघात व त्यात गेलेले तीन बळी, तर बुधवारी आणखी एका अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा तीव्र स्वरुपात समोर आला आहे. गेल्या महिन्यापासूनच महामार्गासह शहरातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीचा विषय सुरू असून जनभावनांच्या रेट्यामुळे या रस्त्यांवर तात्पुरती व थातूरमातूर दुरस्ती करण्यात येत आहे.

महामार्गावर पेव्हर ब्लॉक

शहरातून जाणाऱ्या महामार्गाची अवस्था विशेषत: उड्डाणपुलांसह आयटीआयसमोरील भाग, आकाशवाणी चौकासह इच्छादेवी व अजिंठा चौकात अधिक खराब झाली आहे. या पार्श्र्वभूमीवरर खड्डे बुजविण्यासाठी पर्याय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) आकाशवाणी चौकात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा प्रयोग राबविला. गेल्या महिन्यात एका रात्रीतून ते बसविण्यात आले. (latest marathi news)

खड्डे बुजविले, पण...

या प्रयोगाद्वारे ‘न्हाई’ने या वर्दळीच्या व व्हीआयपी चौकातील खड्डे तर बुजविले, मात्र पेव्हर ब्लॉकमुळे त्याच्या लागून असलेला रस्ता आणखी खराब होऊ लागला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने त्यावर डांबरीकरणाद्वारे पॅचवर्क करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. परंतु, आता पेव्हर ब्लॉकद्वारे, नंतर एखाद्या नव्या प्रयोगावर खर्च करुन तो वाया जाण्याचीच जास्त शक्यता आहे.

स्मशानभूमीजवळही अतांत्रिक दुरुस्ती

अजिंठा चौक ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता कॉंक्रिट करण्यात आला आहे. सर्व तांत्रिक नियम धाब्यावर बसून बनलेल्या या रस्त्यावरुन जाताना वाहनधारकांचा संताप होतो. तयार झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत रस्त्यावर खड्डे पडले. नागरिकांसह माध्यमांनी आक्षेप घेतल्यावर कंत्राटदाराने डांबरी पॅचवर्क करुन हे खड्डे बुजवले. त्यातून ते अधिकच मोठे झाले व रस्त्याची दुरवस्था झाली.. अशाप्रकारे कोट्यवधींचा खर्च करुन रस्त्यांची दुरुस्ती तर होतच नाही, उलट दुरवस्था वाढत चालली आहे.

"कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांची दुरुस्ती करताना सर्व तांत्रिक बाबींचा अवलंब करायला हवा. डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर खड्डे बुजविताना, दुरुस्ती करताना डांबरी पॅचवर्क, कॉंक्रीटच्या रस्त्यावर कॉंक्रिटद्वारे दुरुस्ती करणेच तांत्रिकदृट्या योग्य ठरते. सध्या या रस्त्यांवर तातडीचा उपाय म्हणून ज्या पद्धतीने दुरुस्ती केली जात आहे, ती अयोग्य आहे. त्यामुळे भविष्यात आणखी बिकट अवस्था या रस्त्यांची होईल."- अनीश शाह, उपाध्यक्ष, क्रेडाई, महाराष्ट्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT