चोपडा : वेळोवेळी अमली पदार्थ, मद्यपान, अवैध दारू या प्रकरणी कारवाई केली जावी आणि त्याची प्रत वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात यावी. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा भागातील मतदान केंद्रांवर आणि चेक पोस्टवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याच्या सूचना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या चोपडा पोलिस विभागाच्या बैठकीत देण्यात आल्या. (Jalgaon Pay attention to check post in border area loksabha election 2024 news)
चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करण्यात यावी, आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कसून तपासणी केली जावी, गाड्यांवर कुठल्याही प्रकारचे झेंडे लावण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी गजानन पाटोळे यांनी बैठकीत सांगितले.
बैठकीत चोपडा तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रे, धार्मिकदृष्ट्या तणाव क्षेत्र, शस्त्र परवाना, प्रतिबंधात्मक कारवाई आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. लोकसभा मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी पोलिस विभागाने घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली. (latest marathi news)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. यात अडावद पोलिस ठाण्यांतर्गत १७, तर चोपडा शहरातील ४२ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांच्या भागात शांतता समितीची वेळोवेळी बैठक घेऊन मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीला अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलिस निरीक्षक मधुकर सावळे, ग्रामीण पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे व अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.