Jalgaon News : फोटोग्राफीचा व्यवसाय खूप जुना आहे. खानदेशात सोनगीर येथील फोटोग्राफर जुन्या तंत्रज्ञानावर सर्वत्र खानदेशात जाऊन फोटो काढत असत. साधारणपणे सत्तरच्या दशकात फोटो काढून मिळणे कठीण होते. त्यात तंत्रज्ञान वाढत गेल्याने हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले आणि या मोबाईल वरच फोटो काढणे सुरू झाल्याने फोटोग्राफी व्यवसायावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. (Photography business has been taken over by mobile phones )
सन १९७० च्या दशकात फोटो काढून मिळणे शक्य होत नव्हते. त्यानंतरच्या काळात ब्लॅक अँड व्हाइट फोटो आले. पुढे त्यासह रंगीत फोटोंचा जमाना आला. मात्र ८० ते ९० च्या दशकापर्यंत रंगीत फोटो धुवून घेण्यासाठी मुंबई आणि कलकत्त्याची संपर्क साधावा लागत असे. त्यानंतरच्या काळात मात्र जिल्ह्यावरच काय, तालुक्यावरही रंगीत फोटो धुऊन देणारे फोटो स्टुडिओ आणि लॅब सुरू झाल्या. १९९० ते २०१५ पर्यंत फोटो प्रिंट करून मिळत असत.
मधल्या तीन, चार दशकात हा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोहोचला. या व्यवसायात अनेकांना रोजगारही मिळाला. मात्र त्यानंतरच्या काळात रंगीत कॅमेरे असलेले वेगवेगळे मोबाईल आल्यानंतर आणि त्यांची कार्यक्षमता अधिक मेगापिक्सलची असल्याने वेगवेगळ्या प्रकारचे फोटो मोबाईलवरच काढून घेणे सोपे जाऊ लागले. १९९० नंतर रंगीत फोटो काढून घेणे, व्हिडिओ बनविणे सोपे जाऊ लागले. (latest marathi news)
त्या काळात काही डिजिटल कॅमेरेही ग्राहकांना परवडतील अशाप्रकारे मिळू लागले. सुरवातीला कॅमेरा आल्यावर त्यात ३६ फोटोचा रोल राहत असे. नंतरच्या काळात २४ फोटोचा रोल मिळू लागला. साकुरा, कोनिका या कंपन्या त्यात पुढे होत्या. निकॉनचे कॅमेरे खूप वापरले गेले. अर्थात कॅमेरा हजारापासून लाखापर्यंत येत असताना त्यातून निघणारी प्रिंट आणि क्लिअरिटी ही फोटोग्राफीमध्ये जास्त महत्त्वाची असते.
मधल्या काळात रंगीत फोटो पोस्ट कार्ड साईज साधारणपणे २५ रुपये दराने ग्राहकांना दिली जात असत. तर ते स्वतः कॅमेऱ्याने काढल्यास आठ ते नऊ रुपयांपर्यंत पडत असत. हे सर्व होत असताना लग्न समारंभात व हळदीसह फोटोग्राफीसाठी आजही फोटो स्टुडिओतील फोटोग्राफर यांच्याशी संपर्क साधला जातो. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या कलात्मक फोटोग्राफी होऊ लागल्याने व अलीकडच्या काळात तर प्री-वेडिंग फोटोचे फॅड आल्यानंतर लग्न समारंभातील एकूण फोटोग्राफी वरचा खर्च ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
मात्र त्या बदल्यात मिळणारे फोटो खूपच कलात्मक आणि स्पष्ट असे येऊ लागले आहेत. मोबाईलचा वापर वाढल्यानंतर कुठेही आणि केव्हाही फोटो काढणे सोपे जाऊ लागले. सर्वच फोटोंसाठी मोबाईलचा वापर होत असला तरी सुद्धा कलात्मक आणि सुंदर आणि मोठ्या कार्यक्रमाचे फोटोंसाठी मात्र आजही फोटो स्टुडिओतील फोटोग्राफर बोलवले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.