DRM Iti Pandey and others expressing happiness after the start of the third line on Pimparkhed to Chalisgaon railway line.  esakal
जळगाव

Jalgaon News : पिंपरखेड-चाळीसगाव रेल्वे मार्गावर तिसरी लाइन सुरू! प्रतितास 120 किलोमीटर गतीने चाचणी

Jalgaon News : मध्य रेल्वेने भुसावळ - मनमाड तिसऱ्या मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाच्या विद्युतीकरणासह पिंपरखेड ते चाळीसगाव सेक्शनची २५ किलोमीटरची नवीन तिसरी लाइन यशस्वीरित्या सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मध्य रेल्वेने भुसावळ - मनमाड तिसऱ्या मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाच्या विद्युतीकरणासह पिंपरखेड ते चाळीसगाव सेक्शनची २५ किलोमीटरची नवीन तिसरी लाइन यशस्वीरित्या सुरू केली आहे. (Jalgaon Pimparkhed Chalisgaon railway line starts third line Tested at speed of 120 kilometers per hour marathi news)

मध्य रेल्वेने ३२.०७ किलोमीटर पिंपरखेड ते चाळीसगाव सेक्शनची नवीन तिसरी लाइन विद्युतीकरणासह यशस्वीपणे सुरू केल्याची घोषणा केली आहे. जो महत्त्वाकांक्षी १८३.९४ किलोमीटर भुसावळ-मनमाड तिसरी लाइन विद्युतीकरण प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

हे यश आयुक्त, रेल्वे संरक्षा (सीआरएस), सेंट्रल सर्कल यांच्या देखरेखीखाली काळजीपूर्वक सुरक्षा तपासणी आणि १२० किलोमिटर प्रति तास गती चाचणीनंतर मिळालेले आहे. या विभागात पिंपरखेड, नायडोंगरी, हिरापूर आणि चाळीसगाव यासह धोरणात्मकदृष्ट्या स्थित स्थानके आहेत, ज्यापैकी प्रत्येक स्थानकाच्या यार्डमध्ये बदल करण्यात आले आहेत.

मुंबई- हावडा या व्यस्त मार्गाचा अविभाज्य भाग असलेल्या मनमाड-भुसावळ विभागातील वाहतूक गर्दी कमी करण्यासाठी या नवीन तिसऱ्या लाइनची यशस्वी अंमलबजावणी होणार आहे. हे परिवर्तन केवळ ऑपरेशनल कार्यक्षमतेतच वाढ करणार नाही तर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर ट्रेनचा वेग देखील वाढवेल, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव वाढेल.

यावेळी रेल्वे संरक्षा (सेंट्रल सर्कल) आयुक्त मनोज अरोरा यांच्यासह प्रमुख अधिकारी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे, उपमुख्य अभियंता किशोर सिंह हे पिंपरखेड ते चाळीसगाव विभागाच्या सुरक्षा तपासणी, वेग चाचणी आणि कार्यान्वित समारंभास उपस्थित होते. (latest marathi news)

रेल्वेला एका दिवसात साडेतीन कोटींचे उत्पन्न

भुसावळ रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एका दिवसात माल वाहतुकीतून सर्वाधिक महसूलचा विक्रम केला. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने १२ मार्चला तीन कोटी ५९ लाख किमतीची माल वाहतूक केली आहे. जे चालू आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये एका दिवसात सर्वाधिक आहे.

भुसावळ विभागात २४ गुड्स शेड आणि १२ साइडिंग आहेत. जिथून भारताच्या सर्व भागांमध्ये अनेक माल लोड केला जातो. नाशिक, जळगाव, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि खंडवा जिल्ह्यांत पसरलेल्या गुड्स शेड्समधून पेट्रोलियम, डी-ऑइल्ड केक्स, कांदा, गहू, मका आदी वस्तू लोड केल्या जातात.

गेल्या काही वर्षांत भुसावळ विभाग नाशिक शहरातून ऑटोमोबाईल लोडिंगला आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. बारा मार्चला एकूण ३२ हजार १०१ टन विविध माल ५१७ वॅगनमध्ये ११.५ रेकच्या समप्रमाणात लोड केल्या गेल्या. या दिवशी विभागाला एकूण ३ कोटी ५९ लाख रुपयाचा महसूल माल वाहतुकीतून प्राप्त झाला.

५१७ वॅगनपैकी मनमाड येथील भारत पेट्रोलियम डेपोमधून १५० वॅगन्स पेट्रोलियमने लोड करण्यात आले. पारस थर्मल स्टेशनवरून १६६ वॅगन कोळशाचे, लासलगाव आणि मनमाड येथून ६९ वॅगन कांद्याचे, ४९ वॅगन ऑटोमोबाईल, ४२ वॅगन खंडवा येथून गहू, ओरिएंट सिमेंट कारखाना जळगाव येथून २१ वॅगन आणि चाळीसगाव येथून २० वॅगन चारा. अशा प्रकारे एकूण ५१७ वॅगन लोड करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT