Officers and staff during the distribution of textbooks by the Education Department of the Panchayat Samit. Neighbor Center Head and Principal. esakal
जळगाव

Jalgaon News : शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 हजार विद्यार्थ्यांना पुस्तके; शिक्षण विभागाचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : उन्हाळी सुट्टी संपणाच्या मार्गावर असून, येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या हातात समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके पडणार आहेत. अमळनेर तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या प्राथमिक, खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मराठी, सेमी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या २३३ शाळांमधील २७ हजार २०० मुलांना पुस्तकांचा लाभ मिळणार आहे. (Books to 27 thousand students on first day of school )

शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी अमळनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे पुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

२३३ शाळांमधील विद्यार्थ्यांना लाभ

पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून तालुक्यातील २३३ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी २७ हजार २०० पुस्तकांच्या संचाची मागणी केली होती. शाळांनी भरलेल्या युडाएसवरील माहितीनुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण होणार आहे.

१ जूनपासून शहरातील प्रताप हायस्कूलमध्ये पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, तुषार बाविस्कर, देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील, राहुल चौधरी, प्रशांत पाटील, पवन शिंदे, पंकज काटे, महेंद्र पाटील, किशोर पाटील, हंसराज पाटील, सीमा पाटील, शितल पाटील, रेखा वार्डे, मोनाली पाटील, सोनाली पिंगळे, सुनीता पाटील यासह गटसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांमार्फत पाठ्यपुस्तकांचे शाळानिहाय वाटप सुरू आहे. केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांच्या ताब्यात पुस्तके दिले जात आहेत. (latest marathi news)

दप्तराचे ओझे होणार कमी

मागील वर्षांपासून शासनाने इयत्तानिहाय पुस्तकांचे चार भाग केले आहेत. प्रत्येक भागांत सर्वच विषयांचे घटक असणार आहेत. प्रथम चाचणी, सहामाही, द्वितीय चाचणी व वार्षिक, अशा चार भागांत ही पुस्तके विभागली गेल्याने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांची सजावट

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी शहर, तसेच तालुक्यातील अनेक शाळांनी सजावट केली आहे. पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे संदेश पालकांपर्यंत पाठविले आहेत. अनेक शाळा मिठाई, गुलाबपुष्प देऊन, तसेच रंगीत फुग्यांची सजावट करून मुलांचे स्वागत करणार आहेत.

''विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेत पाठ्यपुस्तके मिळावीत, यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. तालुक्यातील पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला पाठयपुस्तके मिळणार आहे.''-रावसाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी, अमळनेर

असे होईल पाठयपुस्तकांचे वाटप(मराठी,सेमी इंग्रजी व उर्दू माध्यम)

इयत्ता १ ली- २२१८

इयत्ता २ री-२५३६

इयत्ता ३ री -३२०७

इयत्ता ४ थी-३६१९

इयत्ता ५ वि- ३५३६

इयत्ता ६ वि-३६६४

इयत्ता ७ वि- ४२५२

इयत्ता ८ वि- ४१४८

एकूण २७,२००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT