Excess water flowing through drainage. esakal
जळगाव

Jalgaon Kharif Season : अनेर धरणाच्या पाण्यावर 5 हजार एकरवर खरीपपूर्व कपाशीची लागवड

Kharif Season : अनेर मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गेल्या महिन्यापासून पाणी सोडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Kharif Season : अनेर मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गेल्या महिन्यापासून पाणी सोडले आहे. या पाण्यामुळे चोपडा व शिरपूर या दोन्ही तालुक्यांतील अनेक शिवारात खरीपपूर्व कपाशीची लागवड झाली आहे. हे पीक आता डोलू लागले आहे. धरणाच्या पाण्यावर किमान पाच हजार एकरवर कपाशीची लागवड झाली आहे. अनेर मध्यम प्रकल्पाचा उजवा कालवा लांब आहे. (Plantation of pre kharif cotton on 5 thousand acres )

तो शिरपूर तालुक्यातील हिसाळे, तोंदे, तरडी, बभळाज, पिळोदा, मांजरोद, पिळोदा, भोरटेक भावेर, होळनांथे आदी शिवारांतील जमिनीला पाणीपुरवठा करतो. खोल व लांब असलेल्या कालव्यामुळे बरीच शेती बागायती झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या भागात खरीपपूर्व कपाशीची लागवड १५ ते २० दिवसांत पूर्ण केली आहे. त्यामुळे या भागातील कपाशी कोळपणी व निंदणीवर आली आहे. (latest marathi news)

डाव्या कालव्यातून लासूर, गणपूर, मराठे, शिकावल आदी शिवारात सुमारे सातशे ते आठशे एकर खरीपपूर्व कपाशीची लागवड झाली आहे. आता पाणी कालव्यातून वापरले जात आहे. उर्वरित पाणी ड्रेनेजमधून नाल्यांमध्ये जात आहे. अनेर प्रकल्पाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना मृग नक्षत्राअगोदरच कपाशी लागवड करणे शक्य झाले आहे. त्यामुळे जमीन पुन्हा हिरवी होण्यास मदत झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT