पारोळा : वाहतूक सिग्नल तोडून पुढे न जाणे, वेग मर्यादा पाळणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे, कारमध्ये सीटबेल्ट लावणे, ओव्हरलोड, ओव्हरस्पीड वाहन न चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन न चालविणे, असे अपघात रोखण्याचे प्रमुख नियम आहेत. परंतु वाहनधारक सर्रास नियम मोडून वाहन चालवितात. (Police Inspector Pawar statement Violation of traffic rules can lead to cancellation of license)
परंतु आता वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले असून, नियम मोडल्यास दंडासोबत वाहन परवाना देखील निलंबित किंवा रद्द होऊ शकतो, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व पारोळा पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते अपघात सुरक्षितता व स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण कसे करावे.
याविषयी पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी उपप्राचार्य डॉ. एस. बी. भावसार अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. पी. बोरसे, किशोर भोई उपस्थित होते. पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी पीपीटी स्लाईडसद्वारे रस्ते अपघात सुरक्षितता याविषयी माहिती दिली.
दोनचाकी वाहनाद्वारे प्रवास करताना अपघात टाळणे व सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे आवश्यक व सक्तीचे आहे. वय वर्षे अठरा पूर्ण झाल्यानंतर लर्निग लायसन्स, पक्के लायसन्स काढणे व बाळगणे अनिवार्य आहे. ट्रिपल सीट वाहन चालवू नये. रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी, याबाबतीत सविस्तर माहिती दिली. (latest marathi news)
स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण कसे करावे, एटीएम कार्डचा सुरक्षित वापर, बॅंकेत पैसा जमा करणे व काढताना घ्यावयाची काळजी तसेच विद्यार्थिनींनी प्रवासादरम्यान घ्यायची काळजी व स्वसंरक्षण, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन व नोट्स काढणे आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. जे. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. एस. व्ही. चव्हाण, डॉ. डी. एच. राठोड यांनी सहकार्य केले.
मुलांना वाहन देऊ नका
आता १८ वर्षाखालील मुले सरार्स वाहन चालविताना आढळून येत आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांनी या मुलांच्या पालकांना संपर्क साधत त्यांच्या पाल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पाच हजार ते दहा हजारापर्यंत दंड पालकांना आकारण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.