Raksha Khadse, Amol Jawale, Dr. Ketki Patil esakal
जळगाव

Jalgaon Political News : रावेरमध्ये ‘कमळा’साठी तिघे इच्छुक, ‘तुतारी’ला उमेदवाराचा शोध!

Jalgaon Political : रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी उमेदवारीची घोषणा केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या मतदारसंघाकडे लक्ष आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Political News : रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी उमेदवारीची घोषणा केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या मतदारसंघाकडे लक्ष आहे. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनीच तळ्यात मळ्यातची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हाला उमेदवारीचा शोध आहे. सत्ताधारी भाजपकडे मात्र इच्छुकांची गर्दी आहे. (jalgaon political 3 candidates for BJP in raver lok sabha constituency)

खासदार रक्षा खडसे, भाजपत नुकतेच प्रवेश केलेले कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबतची उत्सुकता वाढतेय. जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर दोन मतदारसंघ आहेत.

दोन्ही मतदारसंघांत महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांत चुरस होणार आहे. मात्र सध्या तरी या दोन्ही मतदार संघात उमेदवारीबाबत दोन्ही आघाडीबाबत संभ्रम आहे. महायुतीत जळगाव व रावेर दोन्ही मतदारसंघ सध्या तरी भाजपच लढणार असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीत जळगाव शिवसेना (ठाकरे गट) व रावेर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार गट) लढणार हे निश्‍चित झाल्याचे दिसून येत आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याबाबत दावा सुरू आहे. पक्षाचे नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी या मतदारसंघात लढण्याबाबत कोणताही संबंध नसल्याचे जाहीर केल्यामुळे त्यांच्या नावाला पूर्णविराम मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

रक्षा खडसे यांचा संपर्क दौरा

खासदार रक्षा खडसे या उमेदवारीच्या दावेदार असून तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे. त्यांनी मतदारसंघात भेटीगाठीही सुरू केल्या आहे. त्यांचा अगोदरच मतदार संघात संपर्क आहेच; परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मतदारसंघातील गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटी घेणे सुरूच ठेवले आहे. (Latest Marathi News)

डॉ. केतकी पाटील यांचे अभियान

कॉंग्रेस पक्षातून नुकताच भाजपत प्रवेश केलेल्या माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांनीही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून त्या मतदारसंघात संपर्क अभियान राबवीत आहेत. त्यांचे वडील माजी खासदार यांनी या मतदारसंघात उमेदवारी केलेली आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांचाही संपर्क आहे.

अमोल जावळेंचीही तयारी

माजी खासदार (कै.) हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांनीही मतदार संघात संपर्क सुरू केला आहे. मतदार संघात वडिलांची पुण्याई असल्यामुळे त्याचा फायदा होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला उमेदवारीचा शोध

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातर्फे आमदार एकनाथ खडसे यांनी अगोदर या मतदार संघावर उमेदवारीचा दावा केला होता. त्यांनी उभे राहण्याची तयारीही दर्शविली होती. मात्र आता त्यांनी तब्बेतीच्या कारणास्तव लढू शकणार नसल्याचे पक्ष नेतृत्वाला कळविले आहे. त्यामुळे पक्षाकडून आता कोण उभे राहणार? याकडे लक्ष आहे. त्यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीकडून कोणाचेही नाव अद्याप उमेदवारीसाठी पुढे आलेले नाही.

भाजप उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा?

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सद्यःस्थितीत उमेदवार नसल्याने भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाचा उमेदवार घोषित झाल्यानंतर रावेर मतदारसंघात विरोधी राष्ट्रवादी आपल्या उमेदवारीचे पत्ते खुले करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT