Vidhan Sabha Election 2024 BJP esakal
जळगाव

Jalgaon BJP News : भाजपचे ‘मिशन विधानसभा’! पहिल्या पसंतीच्या तिघा इच्छुकांसाठी पदाधिकाऱ्यांचे मतदान

Latest Vidhan Sabha Election 2024 News : हक्काच्या व जागावाटपात पक्षाकडे हमखास येणाऱ्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत भाजपने निरीक्षक पाठवून त्या प्रत्येक मतदारसंघातील पहिल्या पसंतीच्या तीन इच्छुक उमेदवारांसाठी मतदान करवून घेतले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon BJP News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने हालचाली गतिमान केल्या आहेत. हक्काच्या व जागावाटपात पक्षाकडे हमखास येणाऱ्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत भाजपने निरीक्षक पाठवून त्या प्रत्येक मतदारसंघातील पहिल्या पसंतीच्या तीन इच्छुक उमेदवारांसाठी मतदान करवून घेतले. यात जळगाव शहरासह भुसावळ, चाळीसगाव, जामनेर, रावेर, अशा पाच मतदारसंघांचा समावेश होता. (BJP Mission Assembly election 2024)

३५ वर्षांपासून पक्ष लढवीत असलेल्या आणि सलग सहावेळा जिंकलेल्या मुक्ताईनगर व गेल्या ३० वर्षांत तीनदा जिंकलेल्या अमळनेर विधानसभेची जागा भाजपने मित्रपक्षांना बहाल केल्याचे यातून मानले जात आहे.

भाजपचे ‘मिशन इलेक्शन’

भाजपच्या निवडणुकांची तयारी तशी पाच वर्षे सुरूच असते. लोकसभा निवडणुकीत राज्यातील सुमार कामगिरीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप सध्या ‘इलेक्शन मोड’वर आहे. हक्काच्या व हमखास लढविणाऱ्या जागांसाठी पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

उत्तर महाराष्ट्रात एकावेळी मतदारसंघांत निरीक्षक

मोर्चेबांधणीचा भाग म्हणून उत्तर महाराष्ट्रात भाजपतर्फे हमखास लढविल्या जाणाऱ्या सर्व मतदारसंघांमध्ये पक्षाचे निरीक्षक मंगळवारी एकाच दिवशी, एकावेळी दाखल झाले. पाच मतदारसंघांमध्ये निरीक्षकांच्या उपस्थितीत इच्छुकांसाठी त्या-त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मतदानाद्वारे मते जाणून घेतली.

असे मतदारसंघ असे निरीक्षक

जळगाव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत त्या जागांसाठी निरीक्षकांच्या उपस्थितीत इच्छुकांसाठी मतदान झाले. जळगाव शहरासाठी शिरपूरचे तुषार रंधे, चाळीसगावला धुळ्याचे निवडणूकप्रमुख अनुप अग्रवाल, रावेरला शिंदखेड्याचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल, जामनेरला माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भुसावळला चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर निरीक्षक म्हणून हजर होते.

यांनी केले इच्छुकांना मतदान

जिल्ह्यातील पाच जागांसाठी त्या-त्या मतदारसंघातील प्रदेश पद असलेले पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी, मंडलातील प्रमुख पदाधिकारी असे मतदार होते. प्रत्येक मतदारसंघात सरासरी १०० ते १२५ मतदारांनी पहिल्या पंसतीच्या तीन इच्छुक उमेदवारांची नावे लिहून त्यांना मतदान केले. जळगाव शहरासाठी सुमारे २०० कार्यकर्ते मतदार होते. (latest marathi news)

अशी झाली मतदान प्रक्रिया

मतदानासाठी काही निकष ठरवून दिले होते. त्या मतदारसंघात मतदार अथवा पदाधिकाऱ्यांच्या मते पहिल्या पसंतीचे तीन उमेदवार आहेत, त्यांची १, २ व ३ अशा क्रमाने नावे एका चिठ्ठीत लिहायची होती. नावे लिहिताना स्वत:चे नाव लिहायचे नव्हते, अन्यथा स्लीप बाद ठरवली जाणार होती. ज्यांनी मतदान केले, त्यांनी स्लीप एका पाकिटात टाकायची, त्या पाकिटावर पदाधिकाऱ्याचे नाव नव्हते तर कोड होता. प्रत्यक्ष यादीत नावांसमोर ‘कोड’ होता. त्यानुसार तपासणी करून स्लीप बाद अथवा वैध ठरविण्यात येणार आहेत. मतदान स्लीप मोठ्या पाकिटात एकत्रित करून प्रदेश कार्यालयास पाठविण्यात येणार आहेत.

मुक्ताईनगर अपक्षाला, अमळनेर मित्रपक्षाला

महायुतीत कुठल्याही जागेवरून तिघा घटक पक्षांमध्ये वाद उद्‌भवायला नको, म्हणून भाजपने जिल्ह्यातील अमळनेर व मुक्ताईनगर वगळून त्यांचे आमदार असलेल्या चार व गेल्या अनेक वर्षांपासून लढत असलेल्या रावेरच्या जागेसाठीही निरीक्षकांच्या उपस्थितीत इच्छुकांसाठी मतदान घेतले.

विशेष म्हणजे मुक्ताईनगर मतदारसंघ २०१४ पर्यंत भाजप सलग तीस वर्षांपासून जिंकत आला आहे, तर अमळनेर मतदारसंघातही तीनवेळा भाजपचे आमदार राहिले आहेत. पैकी अमळनेरला मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री अनिल भाईदास पाटील आहेत. मात्र, मुक्ताईनगरला चंद्रकांत पाटील अपक्ष आमदार असतानाही भाजपने ही जागा सोडून दिल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT