Eknath Khadse & BJP esakal
जळगाव

Jalgaon Political News : खडसेंची संभाव्य ‘घरवापसी’! भाजपचे ‘रिस्क मॅनेजमेंट’

Political News : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा यांनी त्यांना भाजपत येण्याचे आवाहन केल्यानंतर खडसेंच्या भाजपत येण्याची चर्चा सुरु झालीय..

सकाळ वृत्तसेवा

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा यांनी त्यांना भाजपत येण्याचे आवाहन केल्यानंतर खडसेंच्या भाजपत येण्याची चर्चा सुरु झालीय.. खडसेंनी त्यास स्पष्टपणे नकार दिला असला तरी; सध्याची सार्वत्रिक राजकीय स्थिती पाहता असे होणारच नाही;

हे म्हणणे धाडसाचे ठरेल. स्वतः: खडसेंनी शरद पवार गटाकडून लोकसभा लढविण्याचे संकेत दिल्यामुळे ‘रिस्क मॅनेजमेंट’ हाताळणाऱ्या भाजप (BJP) श्रेष्ठींकडून स्थानकांचा विरोध दुर्लक्षून खडसेंच्या प्रवेशाला ‘ग्रीन सिग्नल’ दिला जाऊ शकतो.. (Jalgaon Political eknath Khadse BJP marathi news)

येत्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘अब की बार चारसों पार’चा नारा देत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी भाजपने राजकारणाच्या सर्व पातळ्यांवर, हवे ते प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपपासून दुरावलेले मित्रपक्ष, पक्षांतर्गत वादाने दुरावलेले व नाराज नेत्यांना जवळ करण्यासाठी देशव्यापी टीम काम करतेय. राज्यातही अशा काही नेत्यांना पुन्हा जवळ करून, पक्षात घेऊन ‘मिशन ४५ प्लस’ गाठण्याचे भाजपचे उद्दिष्ट्य आहे.

आणि याच उद्दिष्टांतून राज्यात अन्य पक्षांमधील नेत्यांना प्रवेश देऊन विरोधी महाविकास आघाडीला कमकुवत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आठवडा होत नाही, तोच अन्य मोठ्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे.

साधारण दोन आठवड्यांपूर्वीही खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. नंतर मात्र ही चर्चा थांबली. आता परवा त्यांच्या स्नुषा रक्षा खडसेंनी ‘नाथाभाऊंनी भाजपत यावे, ही अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे..’ असे म्हणत त्यांना आवतन दिलं. खडसेंनी आपण पवारांसोबतच राहू, असा निर्वाळा दिल्याने हा विषय थांबला, असे म्हणता येणार नाही. कारण, दुसऱ्या बाजूला खडसेंचे कट्टर विरोधक मंत्री गिरीश महाजनांनी ‘यायचं असेल तर रोखलंय कुणी?’ असा प्रश्‍न उपस्थित करत खडसेंना डिवचलं.

फडणवीस- महाजनांशी इतके वितुष्ट झालेले असताना खडसेंना भाजपत प्रवेश कसा मिळेल? हा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मुळात खडसेंनी भाजप सोडताना केंद्रीय नेतृत्वाबद्दल त्यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. त्यांचा रोष फडणवीस- महाजनांवरच होता. त्यामुळे भाजपचे शीर्ष नेतृत्व व खडसेंमध्ये वितुष्ट नाही.

मोदींचा करिष्मा, अमित शहांची रणनीती, कार्यकर्त्यांचे ‘केडर’, सूक्ष्म नियोजन, बुथपातळीपर्यंतचे नेटवर्क, विखुरलेला व कमकुवत विरोधी पक्ष या भाजपसाठी जमेच्या बाजू असल्या तरी; शेतकरी आंदोलन, बेरोजगारी, ईडी- सीबीआयच्या गैरवापराबाबत विरोधकांच्या आरोपाबाबत जनतेचा समज या बाबी भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकतात.

महाराष्ट्रात तर फोडाफोडीचे राजकारण, आणि आता मराठा आरक्षणाच्या मुद्याने भाजपविरोधात तापलेले वातावरण अशा गोष्टींमुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व, विशेषत: अमित शहा कुठलीही ‘रिस्क’ घेण्याच्या तयारीत नाही.

उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असल्याने एकेक जागा महत्त्वाची मानत भाजपचे केंद्रीय नेतृत्व अशी काही गणितं जोडण्यावर भर देतेच आहे, त्यात खडसेंमुळे आणखी एखादी ‘बेरीज’ करताना पक्ष मागेपुढे पाहणार नाही, असेही मानले जातेय. (Latest Marathi News)

अडचणीच्या काळात पवारांनी खडसेंना साथ दिली, विधान परिषदेवर घेतले; मग पवारांची साथ खडसे कशी सोडतील? असाही प्रश्‍न विचारला जाऊ शकतो. मात्र, पवारांची सावली बनून राहिलेले नेते त्यांना सोडून अजितदादांसोबत गेले, मग खडसे का नाही? खडसे स्वत: व्यापक जनाधार असलेले नेते. त्यामुळे भाजपत असताना त्यांनी विरोधात राहूनही जळगाव जिल्ह्यात, खानदेशात वर्चस्व राखले. कारण, त्यांची कार्यकर्त्यांना संघटित करण्याची शैली आणि

भाजपचे ‘केडर’ या दोन्ही गोष्टी परस्परांना पूरक ठरल्या. राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना भाजपतील तसा करिष्मा करता आलेला नाही. कारण, राष्ट्रवादीत ‘केडर’ नाही आणि त्या मर्यादा खडसे जाणतात. शिवाय, राजकारणात इतकी वर्षे झाल्यानंतर राजकीय दूरदृष्टीतून ते योग्य निर्णय घेऊ शकतील. तूर्तास तरी स्वत: खडसे अथवा भाजपकडून तसे काही संकेत दिसत नाहीत.

खडसेंची ‘हॉटलाईन’

गेल्या आठवड्यापूर्वी महाजनांनी खडसेंच्या प्रवेशाबद्दल त्यांची वरिष्ठांशी ‘हॉटलाइन’ असेल, आणि ते प्रयत्न करतांय, असे वक्तव्य केले होते. खडसेंनी भाजपतील ‘हॉटलाइन’ वापरली, म्हणूनच त्यांच्या प्रवेशात अडचणी निर्माण करण्यासाठी स्थानिक भाजपनेते सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. खडसेंच्या मालमत्तांवर बोजा चढविण्याबाबत मंगेश चव्हाणांनी थेट मुंबईच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेणे, हा त्याचाच भाग असल्याचेही मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT