NCP (Sharad Chandra Pawar) state president Jayant Patil speaking at the workers meeting held on Sunday. Officials on stage. In the second photo, activists and officials present at the meeting. esakal
जळगाव

Jalgaon Political: तिजोरीत खडखडाट अन्‌ घोषणांचा पाऊस : प्रदेशाध्यक्ष पाटील यांची टीका; NCP (शरदचंद्र पवार) पक्षाचा मेळावा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Political : राज्य शासन घोषणाबाजीत बुडाले आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे अन्‌ घोषणांचा पाऊस शासन पाडत आहे. महायुतीचे सरकार भेदरले आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी आता कपडे काढायलाही मागे पुढे पाहणार नाही.

माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी नाही, तर सरकार टिकून राहण्यासाठी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी रविवारी (ता. २१) येथे केली. (Jalgaon Political NCP Sharad Chandra Pawar party meeting)

शिरसोली रोडवरील श्रीकृष्ण लान्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, सहकार विभागाचे अध्यक्ष वाल्मीक पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हा निरीक्षक प्रसन्नजित पाटील, अशोक लाडवंजारी, राजीव देशमुख, रिंकू चौधरी, वंदना चौधरी, तिलोत्तमा पाटील आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, की महाराष्ट्रावर सात लाख कोटींचे कर्ज आहे. आता पुन्हा एक लाख १० हजार कोटींचे कर्ज शासन काढत आहे. कर्ज काढून घोषणांचा पाऊस शासन पाडत आहे. कर्जाचा भार आपल्यावरच येणार आहे. राज्यात आपली सत्ता असताना अरुणभाई अर्थमंत्री होते, तेव्हा कर्ज काढण्याची वेळी आपल्या सरकारवर नव्हती.

शेतकरी, बेरोजगार नाराज

कांदा व केळी उत्पादक शेतकरी राज्य शासनावर नाराज आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात नाही. पीकविम्याचे पैसेही मिळत नाहीत. कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे महायुतीने आणली. गेल्या पाच महिन्यांत १ हजार ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात बेरोजगारीचा दर ९ वरून १८ टक्क्यांवर गेला आहे.

युवकांच्या हाताला काम नाही. बेरोजगारी वाढली आहे. विद्यार्थी रात्रन्‌रात्र अभ्यास करून विविध स्पर्धा परीक्षा देतात. मात्र, पेपरफुटीमुळे त्यांचे वर्ष वाया जात आहे. महायुतीने बेरोजगार मेळावे घेतले. मात्र, ४० लाख बेरोजगारांपैकी केवळ २५ हजारांना रोजगार मिळाला. महाराष्ट्रातील गुंतवणूक कमी झाली आहे, असे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले.

तुरंगात जाण्यापेक्षा ‘भाजप’त जा

राज्यात महायुती सरकारने २५ राजकीय नेत्यांवंर गैरव्यवहाराचे आरोप करून ईडी, आयटीचे छापे टाकून कारवाया सुरू केल्या होत्या. त्यापैकी २३ नेते ‘भाजप’मध्ये गेल्याने त्यांच्यावरील कारवाया थांबविल्या आहेत. तुरुंगात जाण्यापेक्षा ‘भाजप’मध्ये गेलेले चांगले, असे हे नेते म्हणताहेत. या नेत्यांनी किती कोटींचा घोटाळा केला, हे जनतेसमोर यायला हवे, असे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले. (latest marathi news)

मंत्री अनिल पाटलांवर टीका

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आपत्ती व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, की अमळनेरच्या एका आमदाराने सांगेल त्यांना कंत्राट देण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडले आहे. दोन वर्षांत गैरव्यवहाराचा कळस घातला आहे.

डांबर घोटाळ्याला उत्तर नाही

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, की डांबर घोटाळा सर्वांना माहित आहे. एकच बिल सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका आदी विभागातून मेघा कंपनीने काढून कोट्यावधींचा घोटाळा केला. याप्रकरणी कंत्राटदाराला एक कोटीचा दंड झाला. मात्र, तो अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला. हा प्रश्‍न मी विधानसभेत विचारला असता, त्याला अद्यापही उत्तर मिळालेले नाही, असे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले.

माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष जाहीरनामा तयार करीत आहे. ‘माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र ’अभियान राबविणार आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यात सहा जागा निवडून

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, की लोकसभेत जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगावची जागा जिंकू, असा आम्हाला विश्‍वास होता. दोन्ही जागा निवडून आल्या नाहीत, याची खंत आहे. मात्र आता झपाटून कामाला लागा. पक्षाच्या किमान सहा ते सात जागा निवडून आणाच. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना सहकार्य करून त्यांचे उमेदवारही निवडून आणा. कृषिभूषण साहेबराव पाटील (अमळनेर) यांनी पक्षात प्रवेश केला. वाय. एस. महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT